PM किसान योजनेचा २२ वा हप्ता खात्यात जमा झालाय का? अशाप्रकारे घरबसल्या तपासा

On: March 13, 2026 5:15 PM
MahaDBT Subsidy
---Advertisement---

PM Kisan 22nd Installment | देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 22 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या हप्त्याच्या माध्यमातून सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवला जाणार आहे.

सरकारकडून मिळणाऱ्या या आर्थिक मदतीची अनेक शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे हप्ता खात्यात जमा झाला की नाही, हे तपासण्याची उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. मात्र ही माहिती आता शेतकरी घरबसल्या काही मिनिटांत सहज तपासू शकतात.

कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार निधी :

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारकडून दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना 6 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी 2 हजार रुपये अशा स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. (PM Kisan 22nd Installment)

या वेळी 22 व्या हप्त्याच्या माध्यमातून सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा निधी देशभरातील जवळपास 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल, त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.

PM Kisan 22nd Installment | असा तपासा तुमच्या खात्यात हप्ता आला का :

शेतकरी पीएम किसान योजनेचा हप्ता खात्यात जमा झाला की नाही हे ऑनलाइन पद्धतीने तपासू शकतात. त्यासाठी सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे. त्यानंतर ‘Farmer Corner’ या पर्यायावर क्लिक करून ‘Beneficiary Status’ हा पर्याय निवडावा.

यानंतर आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून ‘Get Data’ वर क्लिक केल्यास लगेच पेमेंट स्टेटस दिसून येईल. जर हप्ता जमा झाला नसेल तर घाबरण्याची गरज नाही. अनेकदा ई-केवायसी पूर्ण नसेल, आधार लिंक नसेल किंवा एग्रीस्टॅकमध्ये नोंदणी नसेल तर हप्ता थांबू शकतो.

याशिवाय या योजनेबाबत काही अडचण असल्यास शेतकरी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकतात.

News Title: PM Kisan 22nd Installment Released Check Your Payment Status Online

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now