शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसान योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?

On: February 15, 2026 12:40 PM
PM Kisan 23rd Installment
---Advertisement---

PM Kisan Scheme | देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Samman Nidhi Yojana) पुढील हप्त्याकडे लक्ष ठेवून आहेत. २२ व्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत असून, लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही शेतकऱ्यांना एकरकमी चार हजार रुपये मिळण्याचीही चर्चा आहे.

२२ व्या हप्त्याबाबतची सविस्तर माहिती :

केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या योजनेअंतर्गत दरवर्षी एकूण ६,००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान टप्प्यांमध्ये, साधारण चार महिन्यांच्या अंतराने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत २१ हप्ते वितरित करण्यात आले असून, शेवटचा म्हणजे २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. त्यामुळे आता पुढील म्हणजे २२ व्या हप्त्याची उत्सुकता वाढली आहे.

या योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ दरम्यान करण्यात आली होती. त्या वेळी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी याची घोषणा केली होती आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचा अवलंब करणारी ही जगातील सर्वात मोठी योजना म्हणून ओळखली जाते.अशातच आता मिळालेल्या माहितीनुसार २४ फेब्रुवारी २०२६ रोजी २२ वा हप्ता वितरित होऊ शकतो, मात्र अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

PM Kisan Scheme | हप्ता रोखला जाण्याची कारणे :

ज्या शेतकऱ्यांनी eKYC पूर्ण केलेली नाही किंवा भू-सत्यापनाची प्रक्रिया अपूर्ण ठेवली आहे, त्यांना हा हप्ता मिळू शकणार नाही. तसेच बँक खात्याचा चुकीचा तपशील, IFSC कोडमध्ये त्रुटी, नावाच्या स्पेलिंगमधील चुका किंवा आधार क्रमांकातील अचूकता नसल्यास रक्कम जमा होण्यास अडथळा येऊ शकतो. या त्रुटी दुरुस्त केल्याशिवाय संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात २२ वा हप्ता जमा होणार नाही. (PM Kisan Scheme)

उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा आदी राज्यांमध्ये Farmer ID अनिवार्य करण्यात आली आहे. या राज्यांमध्ये Farmer ID तयार करण्यासाठी विशेष शिबिरे तसेच विविध केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. Farmer ID नसलेल्या शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. लाभार्थ्यांनी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी. शेतकरी कॉर्नरमध्ये जाऊन लाभार्थी यादी तपासून आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक नोंदवून “Get Data” वर क्लिक केल्यास पेमेंट स्थिती पाहता येते.

ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी २१ वा हप्ता मिळाला नव्हता, त्यांनी आता eKYC आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांना प्रलंबित रक्कम आणि २२ वा हप्ता मिळून एकूण ४,००० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

News Title: PM Kisan 22nd Installment Date

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now