शेतकऱ्यांनो अशाप्रकारे चेक करा PM किसान योजनेच्या 17 वा हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळणार की नाही?

On: May 10, 2024 12:27 PM
PM Kisan Yojana
---Advertisement---

PM Kisan Yojana l शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकार PM किसान निधीच्या 17 व्या हप्त्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या तयारीत आहे. जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही पीएम किसान योजना 2024 च्या 17 व्या हप्त्यासाठी पात्र आहेत की नाही हे तपासावा लागणार आहे.

लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 17 व्या हप्त्याचे पैसे होणार जमा :

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 17 व्या हप्त्याची अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, परंतु 16 वा हप्ता 2 फेब्रुवारी 2024 रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पोहोचला आहे. 17 व्या हप्त्यातील 2000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील. पेमेंट हस्तांतरणाच्या एक आठवडा आधी शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारकडून प्रसिद्ध केली जाईल.

जर तुमचे नाव यादीत असेल आणि त्याच्या खात्यात 2000 रुपये जमा झाले नाहीत, तर त्या शेतकऱ्याला 1-2 आठवडे वाट पाहावे लागू शकते. कारण या प्रक्रियेत बरेच व्यवहार होतात. अनेक विनंत्या प्रलंबित असल्यामुळे थोडा विलंब होऊ शकतो. जर तुमचे नाव पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जारी केलेल्या हप्त्यांच्या यादीमध्ये असल्यास तुम्हाला 17 व्या हप्त्याची रक्कम थेट खात्यावर जमा होऊ शकते.

PM Kisan Yojana l पीएम किसान 17 व्या हप्त्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

आधार कार्ड, पॅन कार्ड.
पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आणि रहिवासी पुरावा.
केवायसी प्रक्रिया – फोन नंबर, ई-मेल आयडी.

17 वा हप्ता कसा तपासायचा? :

– सर्वप्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
– लॉग इन केल्यानंतर सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
– त्यानंतर तुमचे स्टेटस जाणून घ्या वर क्लिक करा.
– त्यानंतर तुम्हाला नवीन वेबपृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.

लाभार्थी यादीतील नाव कसे तपासायचे? :

– सर्वप्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
– लॉग इन केल्यानंतर सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
– त्यानंतर वरच्या उजव्या बाजूला असलेल्या प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना लाभार्थी यादी 2024 वर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला एका नवीन वेबपेजवर रीडायरेक्ट केले जाईल. त्यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादीतील तुमचं नाव तपासता येईल.

News Title – PM Kisan 17th Installment

महत्त्वाच्या बातम्या

उन्हाळ्यात वॉटर पार्कला जाणार असाल तर ‘या’ चुकांपासून दूर राहा

शिंदे गटात गेलेल्या वायकरांचे गौप्यस्फोट, “माझ्यापुढे जेलमध्ये जाणं किंवा पक्ष बदलणं हे दोनच पर्याय होते”

भाजप जिंकल्यास मुस्लिमांचं आरक्षण रद्द करून SC, ST आणि ओबीसींना देऊ; अमित शाहांचं वक्तव्य

अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करू शकत नसाल तर या गोष्टी खरेदी करा; पैशांची कमी भासणार नाही

विखे- लंकेंसाठी हे 7 राजकारणी नगरमध्ये धुरळा करणार; विखेंसाठी 4 तर लंकेसाठी 3 सभा होणार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now