पिंपरी चिंचवडमधील आरक्षणात मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर

On: November 19, 2025 9:23 AM
Pimpri Chinchwad
---Advertisement---

Pimpri Chinchwad Reservation | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट समोर आला आहे. आरक्षण सोडतीत झालेल्या त्रुटीची निवडणूक आयोगाने दुरुस्ती केल्यानंतर चार जागांचे आरक्षण बदलले आहे. प्रभाग क्रमांक 30 मधील ‘क’ जागा ओबीसी खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आली होती. मात्र नियम 6(3)(ब) प्रमाणे ही जागा प्रत्यक्षात ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक होते. ही चूक लक्षात आल्यानंतर आयोगाने आरक्षणात तात्काळ बदल केला. (Pimpri Chinchwad Reservation)

या अचानक झालेल्या बदलामुळे प्रभाग 30 आणि प्रभाग 19 मधील इच्छुकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. नागरिक आणि उमेदवारांकडून सूचना आणि हरकतींसाठी 17 ते 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. निवडणूक विभागाचे प्रमुख सचिन पवार यांनी सविस्तर माहिती देत सांगितले की, आयोगाने नियमपालनाच्या दृष्टीने हा बदल तातडीने करणे आवश्यक होते.

आरक्षणातील चूक दुरुस्त; चार जागांमध्ये बदल :

आयोगाने केलेल्या दुरुस्तीनुसार, प्रभाग 30 मध्ये सोडतीत ओबीसी प्रवर्गासाठी निश्चीत झालेली ‘क’ जागा आता ओबीसी महिलांसाठी राखीव करण्यात आली आहे. याच प्रभागातील ‘ड’ जागा पूर्वी सर्वसाधारण महिलांसाठी होती. ती जागा आता सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी करण्यात आली आहे. परिणामी महिलांच्या आरक्षणाची जागा इतर प्रभागात हलवावी लागली. (Pimpri Chinchwad Reservation)

या बदलाचा परिणाम प्रभाग 19 वर झाला आहे. या प्रभागातील ‘ब’ जागा मूळतः ओबीसी महिलांसाठी राखीव करण्यात आली होती. मात्र आता हे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. तसेच प्रभाग 30 मधील ड जागेवरील सर्वसाधारण महिला आरक्षण रद्द करून प्रभाग 19 मधील ‘क’ ही जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad Reservation | नियम काय सांगतो? आयोगाचा निर्णय योग्य का? :

महत्वाचा नियम असा सांगतो की– ज्या प्रभागात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा दोन्ही प्रवर्गांसाठी जागा राखीव आहेत, पण त्यात त्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण नाही, तर अशा प्रभागांमधील ओबीसी प्रवर्गातील जागा महिलांसाठी राखीव करणे आवश्यक आहे. हा नियम प्रभाग क्रमांक 30 मध्ये लागू न झाल्यानेच ही चूक झाली होती. (Pimpri Chinchwad Reservation)

राज्य निवडणूक आयोगाने सोडतीनंतर ही त्रुटी शोधून ताबडतोब दुरुस्ती केली. पिंपरी चिंचवड निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पवार यांच्या मते, नियमांनुसार आरक्षण निश्चित करण्याची ही योग्य पद्धत आहे आणि आता जाहीर केलेले आरक्षण तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे.

दोन्ही प्रभागांतील नवे आरक्षण चित्र जाहीर (Pimpri Chinchwad Reservation) :

प्रभाग 19 – उद्योगनगर, विजयनगर, भाटनगर, पिंपरी कॅम्प

अ – अनुसूचित जाती – महिला
ब – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
क – सर्वसाधारण (महिला)
ड – सर्वसाधारण

प्रभाग 30 – दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी

अ – अनुसूचित जाती
ब – अनुसूचित जमाती (महिला)
क – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
ड – सर्वसाधारण

News Title: Pimpri Chinchwad Reservation Change: Last-Minute Twist Alters Four Seats; Know the Rule Behind It

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now