विद्येच्या माहेरघरात घडलं अत्यंत भयंकर! पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली मोठी कारवाई

On: March 26, 2026 8:16 PM
Pune News (21)
---Advertisement---

Pune News | पिंपरी-चिंचवड शहरात स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या अवैध देहव्यापारावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सम्राट चौक परिसरातील एका स्पावर छापा टाकत तीन महिलांची सुटका केली. या कारवाईमुळे शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर देहव्यवसायाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी स्पा चालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मसाजच्या नावाखाली ग्राहकांना आकर्षित करून देहव्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

‘रिच फील स्पा’वर पोलिसांची धाड :

पोलिसांना संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सम्राट चौक परिसरातील “रिच फील स्पा”मध्ये मसाजच्या नावाखाली देहव्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार २५ मार्च रोजी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. (Pimpri Chinchwad Crime News)

या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली. तसेच स्पा चालक मयूर दिनेश मोहिते (वय २६, रा. दिघी) आणि व्यवस्थापक अक्षय महादेव सुतार (वय २६) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सुतार याला पोलिसांनी अटक केली आहे.

Pune News | यावर्षी आतापर्यंत ८ ठिकाणी कारवाई :

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने २०२६ या वर्षात आतापर्यंत आठ आस्थापनांवर धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. यामध्ये सहा स्पा किंवा मसाज पार्लर आणि दोन हॉटेल्सचा समावेश आहे. या कारवाईत एकूण २० आरोपींना अटक करण्यात आली असून १७ महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. (Spa Prostitution Racket Pune)

मागील तीन वर्षांत अवैध देहव्यवसाय चालवणाऱ्या २९ आस्थापनांवर एक वर्षासाठी बंदी घालण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले आहेत. चालू वर्षातही तीन आस्थापनांवर अशी कारवाई करण्यात आली असून संशयित ठिकाणांची चौकशी सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड आणि बसवराज तेली तसेच पोलीस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार व सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते व त्यांच्या पथकाने केली.

News Title: Pimpri Chinchwad Police Raid Spa Running Prostitution Racket, 3 Women Rescued

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now