पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन!

On: January 3, 2023 11:50 AM
---Advertisement---

पुणे | पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार (BJP MLA) लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचं दीर्घ आजाारने निधन झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार होते.

दीवाळीनंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली.

मध्यंतरी अमेरिकेहून मागवलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगतापांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. इंजेक्शन दिल्यानंतर ते खुर्चीत बसू आणि काही पावले चालूही लागले होते.

विधान परिषद निवडणुकीसाठी जगताप मुंबईला मतदानासाठी देखील गेले होते. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.

पिंपळे गुरव येथील रहिवासी असलेले लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काॅंग्रेस पक्षापासून सुरू झाली. 1992 च्या निवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले.‌ 1997 च्या निवडणुकीतही ते निवडून आले.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now