‘तो तुनिषाचा मामा नव्हेच तर…’, शिझानच्या बहिणीचा मोठा खुलासा

On: January 2, 2023 7:04 PM
---Advertisement---

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानं(Tunisha Sharma) गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. तिच्या आत्महत्येला तुनिषाच्या आईनं तुनिषाचा बाॅयफ्रेंड शिझान खानला(Sheezan Khan) जबाबदार धरत त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

सध्या या प्रकरणी शिझान खान पोलिस कोठडीत आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी शिझान माध्यमांशी बोलताना म्हणाला की, न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. मी निर्दोष आहे, सत्यमेव जयते.

सोमवारी शिझानच्या कुटुंबियांनीही पत्रकार परिषद घेत शिझानवर झालेल्या आरोपांचे खंडन केले. यावेळी शिझानची बहिण म्हणाली आहे की, तुनिषाचा मामा म्हणून जी व्यक्ती वावरत होती तो तिचा मामा नव्हताच तो तर तिचा मॅनेजर होता. यावरून सोशल मीडियावर काय बोललं जातंय हे नव्यानं सांगण्याची गरज नाही.

तुनिषाला कलाविश्वात काम करायचं नव्हतं. तिची अजिबात इच्छा नव्हती. परंतु या सगळ्यात तिच्या आईनं तिला मोठा पाठिंबा दिला आहे. असंही शिझानची बहिण फलक नाझ म्हणाली आहे.

आता शिझानच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत केलेले दावे आणि तुनिषाच्या आईनं शिझानवर केलेले आरोपांबाबत सोशल मीडियावर विविध चर्चांणा उत आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now