1 एप्रिलपासून फिजिकल स्टँप पेपर रद्दी; आता केवळ ई-स्टॅम्प प्रणाली

On: March 31, 2025 2:29 PM
Maharashtra
---Advertisement---

Stamp Paper | देशातील स्टँप पेपर व्यवहारांमध्ये मोठा बदल होत असून, 1 एप्रिल 2025 पासून पारंपरिक फिजिकल स्टँप पेपरचा वापर पूर्णतः बंद होणार आहे. त्याऐवजी केवळ ई-स्टॅम्प प्रणाली लागू होणार आहे. सरकारने पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (Stamp Paper)

31 मार्चनंतर फिजिकल स्टँप पेपर होणार रद्दी 

उत्तर प्रदेश सरकारने फिजिकल स्टँप पेपर व्यवहारासाठी 31 मार्च 2025 ही अंतिम मुदत दिली आहे. त्या तारखेनंतर कोट्यवधी रुपयांचे स्टँप पेपर्स केवळ रद्दी ठरणार आहेत.

तेलगी स्टँप पेपर घोटाळ्यानंतर देशात स्टँप पेपर व्यवस्थेतील बदल सुरु झाले. आता, फिजिकल स्टँप पेपर परत घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान, मूळ रकमेपैकी 10 टक्के कपात करून उर्वरित रक्कम परत दिली जाणार आहे.

ज्यांच्याकडे अजूनही फिजिकल स्टँप पेपर आहेत, त्यांनी www.igrsup.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत ती परत करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नोंदणी झाल्यास, 1 एप्रिल रोजीसुद्धा पेपर जमा करता येईल, परंतु अंतिम मुदत लक्षात घेऊन ती प्रक्रिया तातडीने पार पाडावी लागणार आहे.

ई-स्टॅम्प प्रणालीचे फायदे आणि परिणाम

ई-स्टॅम्प प्रणाली लागू केल्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि करचोरी, बनावट कागदपत्रे यांना आळा बसेल. सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात रेकॉर्ड होणार असल्यामुळे पुढील काळात कोणत्याही गैरव्यवहाराचा शोध घेणे सोपे होणार आहे.

त्यामुळे आर्थिक गैरव्यवस्थापन टाळण्यास मदत होईल. याशिवाय सरकारी महसुलातही वाढ होईल, कारण स्टॅम्प पेपर विक्री आणि नोंदणी ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन होणार आहे.

Title : Physical Stamp Papers to End from April 1

 

Join WhatsApp Group

Join Now