पेट्रोल पंपांवर UPI ने पैसे भरणारांसाठी मोठी बातमी! पेट्रोलियम मंत्रालयाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

On: September 25, 2026 5:14 PM
Petrol Pump UPI Charges
---Advertisement---

Petrol Pump UPI Charges | पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरल्यानंतर UPI ने पैसे देणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 2,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या UPI व्यवहारांवरील MDR म्हणजेच शुल्क हटवण्याची मागणी पेट्रोल पंप डीलर्सनी केली होती. मात्र, पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबत सध्या कोणताही निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या शुल्काबाबत संभ्रम दूर झाला आहे.

UPI शुल्क हटवण्याच्या मागणीवर निर्णय नाही :

पेट्रोल डीलर्सनी 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI पेमेंटवर लागू होणारे 5 टक्के MDR रद्द करण्याची मागणी केली होती. पेट्रोल पंप चालकांचे मार्जिन आधीच निश्चित असल्याने डिजिटल व्यवहारांवरील अतिरिक्त खर्चाचा परिणाम त्यांच्या कमाईवर होऊ शकतो, असा त्यांचा मुद्दा आहे. वाढत्या खर्चाचा विचार करून ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने पेट्रोल पंपांना MDR मधून वगळण्याची मागणी केली आहे.

या मागणीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले की, 2,000 रुपयांपेक्षा जास्त UPI व्यवहारांवरील MDR माफ करण्यासाठी किंवा पूर्णपणे रद्द करण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडे कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नाही. तसेच पेट्रोलियम मंत्रालयाकडूनही या शुल्कासंदर्भात रद्दबातल किंवा सूट देण्याचा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या हे शुल्क हटवण्यात आलेले नाही.

Petrol Pump UPI Charges | 15 ऑक्टोबरपासून शुल्काची अंमलबजावणी :

15 ऑक्टोबरपासून निवडक UPI व्यवहारांमध्ये 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटवर MDR लागू होणार आहे. पेट्रोल पंपांवरील व्यवहारांचाही या नियमात समावेश आहे. त्यामुळे ग्राहकाने पेट्रोल पंपावर 2,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचे पेट्रोल भरून UPI द्वारे पैसे दिल्यास संबंधित व्यवहारावर MDR लागू होईल. डीलर्सच्या मागणीवर अद्याप शुल्कातून कोणतीही अधिकृत सूट देण्यात आलेली नाही.

मात्र, या शुल्काचा थेट भार ग्राहकांवर टाकता येणार नाही. पेट्रोलियम मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार MDRची रक्कम पेट्रोल पंप डीलर्सना भरावी लागेल. ग्राहकाकडून स्वतंत्रपणे 5 रुपये वसूल करण्याची परवानगी नाही. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांनी UPI पेमेंटच्या नावाखाली ग्राहकाला हे शुल्क देण्यास सांगता येणार नाही. सध्या शुल्क कायम असले तरी ते ग्राहकांकडून आकारले जाणार नाही.

News title : Petrol Pump UPI Charges: Government Clarifies

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now