पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का? तर घराबाहेर पडण्यापूर्वी झटपट तपासा आजचे लेटेस्ट दर

On: March 28, 2026 2:34 PM
Petrol Diesel Price
---Advertisement---

Petrol Diesel Price | देशात इंधन दरांबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असताना त्याचा फटका थेट ग्राहकांना बसू नये, यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

मात्र या कपातीनंतर लगेच पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. सध्या देशातील पेट्रोल पंपांवर दरात मोठी घट झालेली नसली तरी संभाव्य दरवाढ रोखण्यात सरकारला यश आल्याचे सांगितले जात आहे.

उत्पादन शुल्कात मोठी कपात :

सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून थेट 3 रुपयांवर आणण्यात आले आहे. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क पूर्णपणे शून्य करण्यात आले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असतानाही देशातील इंधन दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न या निर्णयातून करण्यात आला आहे. (Petrol Diesel Price News)

या निर्णयामुळे सरकारच्या महसुलावर मोठा परिणाम होणार असून अंदाजे 1.70 लाख कोटी रुपयांचा महसूल कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच इंधन निर्यातीवर पुन्हा विंडफॉल टॅक्स लागू करण्यात आला आहे.

Petrol Diesel Price | नांदेडमध्ये जमावबंदीचा आदेश :

दरम्यान इंधन दरवाढीच्या चर्चेमुळे काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर गर्दी वाढल्याचे चित्र दिसून आले. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 अंतर्गत जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून 11 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

News Title: Petrol Diesel Price Today: Excise Duty Cut by ₹10, Check Latest Fuel Rates in Maharashtra

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now