Numerology | अंकशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर तिच्या जन्मतारखेतील मूलांकाचा मोठा प्रभाव असतो. याच अंकशास्त्रात मूलांक 4 हा अत्यंत वेगळा, रहस्यमय आणि संघर्षांनी भरलेला मानला जातो. ज्या लोकांचा जन्म महिन्याच्या 4, 13 किंवा 22 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 4 असतो, असं मानलं जातं. (Numerology number 4)
या मूलांकाच्या लोकांबाबत असं सांगितलं जातं की त्यांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच अनेक चढ-उतार, अडथळे आणि अनपेक्षित परिस्थिती निर्माण होत राहते. मात्र अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना यश, आर्थिक स्थैर्य आणि समाजात मान-सन्मान मिळतो, अशी धारणा आहे.
राहूचा प्रभाव आणि संघर्षमय जीवन :
अंकशास्त्रानुसार मूलांक 4 असलेल्या व्यक्तींवर राहू ग्रहाचा प्रभाव अधिक असतो. राहू हा ग्रह अचानक बदल घडवणारा मानला जातो. त्यामुळे या लोकांच्या आयुष्यात वारंवार मोठे बदल, संकटे आणि अनपेक्षित घटना घडतात. मेहनत करूनही अपेक्षित यश न मिळाल्याने अनेकदा त्यांना निराशेचा सामना करावा लागतो. (Numerology number 4)
या व्यक्ती स्वभावाने हट्टी, ध्येयवेडे आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे असतात. त्यांच्यात नेतृत्वगुण असले तरी ते आपल्या भावना आणि योजना कुणाशी सहज शेअर करत नाहीत. त्यामुळे अनेकदा त्यांना एकट्याने संघर्ष करावा लागतो. काही वेळा चुकीच्या संगतीमुळे चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता देखील अधिक असते, असं अंकशास्त्र सांगतं.
Numerology | संघर्षानंतर मिळणारं यश आणि स्थैर्य :
राहूचा प्रभाव नकारात्मक असेल तर मूलांक 4 असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात अचानक संकटे, आर्थिक अडचणी, व्यवसायात तोटा किंवा नोकरीतील अडथळे निर्माण होतात. कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित फळ मिळत नाही, असा अनुभव या लोकांना अनेकदा येतो.
मात्र काळानुसार राहूचा प्रभाव सकारात्मक झाला की त्याच व्यक्तींना अचानक यश, प्रतिष्ठा आणि आर्थिक उन्नती मिळते, असं मानलं जातं. संघर्षातून शिकलेली शिस्त, चिकाटी आणि आत्मविश्वास हेच त्यांच्या यशामागचं मुख्य कारण ठरतं. त्यामुळे सुरुवातीला अपयश असलं तरी शेवटी हे लोक आयुष्यात मोठं स्थान मिळवतात, अशी श्रद्धा आहे.






