पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्वाची बातमी! आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय

On: October 9, 2025 1:19 PM
PCMC
---Advertisement---

PCMC | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) शहरातील पाणीपुरवठा नियोजन आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेअंतर्गत सर्व घरगुती आणि व्यावसायिक नळजोडण्यांवर पाणी मीटर बसवणे अनिवार्य केले आहे. (PCMC Water Supply)

शहरात आतापर्यंत १० हजारांहून अधिक अनधिकृत नळजोडण्या आढळून आल्या आहेत. या नळजोडण्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. पाण्याची वाढती मागणी आणि मर्यादित साठा पाहता, पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असून, त्याचा लेखाजोखा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मोहिमेला विरोध केल्यास गुन्हा दाखल :

कोणत्याही व्यक्तीने किंवा गटाने या मोहिमेला विरोध केल्यास, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करून, गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील (Pradip Jambhle Patil) यांनी नागरिकांना दिला आहे. तसेच, अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करण्यास गती देण्याचे निर्देशही अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी दिले आहेत.

यामध्ये घरगुती वापरासाठी पाणी मीटर बसविण्याचा खर्च पाणीपट्टीधारकांकडून पाणीबिलातून हप्त्यांमध्ये वसूल केला जाईल. पाणी मीटर बसवल्यामुळे पाणी वापराची अचूक आकडेवारी उपलब्ध होईल, ज्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन सुधारण्यास आणि पाण्याची गळती कमी करण्यास मदत होईल. यामुळे शहरात होणारा अनधिकृत पाण्याचा वापर प्रभावीपणे रोखला जाईल, असा महापालिकेला विश्वास आहे.

PCMC | व्यावसायिकांनी त्वरित मीटर बसवावे :

महापालिकेने व्यावसायिक क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. हॉटेल्स, वॉशिंग सेंटर्स, बांधकामे, आर.ओ. प्लांट्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिकांनी अनधिकृत पाणी वापर तातडीने थांबवावा. ज्यांच्याकडे अनधिकृत नळजोडणी आहे, त्यांनी ती त्वरित नियमित करून पाणी मीटर बसवावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. (PCMC Water Meter)

पाणी मीटरमुळे पाण्याचे योग्य व्यवस्थापन शक्य होईल. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करून वेळेत पाणी मीटर बसवून प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी केले.

News Title :-  PCMC Makes Water Meters Mandatory, Warns of Action Against Opponents

Join WhatsApp Group

Join Now