Parineeti Chopra | बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आपल्या अभिनयाने आणि सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. 2023 मध्ये परिणीतीने आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा याच्यासोबत लग्नगाठ बांधली. बाॅलिवूडमधील क्यूट कपलच्या यादीत परिणीती आणि राघव चड्डा यांचा देखील समावेश आहे. सोशल मीडियावर दोघांची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. दरम्यान, परिणीती आणि राघव दोघेजण लंडनमध्ये असून राघववर शस्त्रक्रिया पार पडली आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून राघव आणि परिणीती (Parineeti Chopra) यूकेमध्ये राहत होते. राघवच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया पार पडणार होती म्हणून दोघे यूकेला शिफ्ट झाले होते. राघव चड्डाची डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आलीये. हेच नाही तर थोडा जरी उशीर झाला असता तर राघव चड्डा याची दृष्टी देखील गेली असती अशी माहिती समोर आलीये. शेवटी ही शस्त्रक्रिया करण्यात आलीये.
View this post on Instagram
काही काळ विदेशात राहणार-
शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर राघवची तब्येत स्थिर आहे असं समोर आलं. जर राघवने ही शस्त्रक्रिया केली नसती तर कायमची त्याची दृष्टी गेली असती असं समजतंय. दरम्यान, पुढील काही दिवस राघवला आराम करावा लागणार आहे. राघव चड्ढा याच्यासोबत परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ही देखील विदेशातच आहे. शस्त्रक्रियेनंतर राघव चड्डा याची काळजी घेण्यासाठी ती विदेशातच थांबलीये. पुढील काही महिने देखील राघव चड्ढाला विदेशातच रहावं लागणार असल्याचं सांगितलं जात आहे.
संगीत क्षेत्रात छाप पाडणार-
परिणीतीने गेल्या वर्षी 24 सप्टेंबर रोजी उदयपूरमध्ये राघव चड्ढा सोबत मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं होतं. लग्नाच्या काही महिन्यांनीच तिने फिल्मी दुनियेऐवजी संगीत दुनिया निवडली आहे. आता परिणीती चित्रपटांऐवजी संगीत क्षेत्रात आपली छाप पाडणार आहे. तिच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.
News Title : Parineeti chopra husband’s eye surgery
महत्त्वाच्या बातम्या-
‘चित्रा वाघ आधी रेवण्णा सेक्स स्कँडलवर बोला’; आदित्य ठाकरेंनी सुनावलं
‘या वयात साहेबांना सोडायला नको होतं’; काय म्हणाले अजित पवार?
‘थॅंक्स टू गद्दार लोक्स’; किरण मानेंची पोस्ट तूफान व्हायरल






