परभणी हिंसाचार प्रकरणातील ‘त्या’ तरुणाचा कोठडीतच मृत्यू, वातावरण तापणार?

On: December 15, 2024 2:05 PM
Parbhani Violence One person died in jail
---Advertisement---

Parbhani Violence | आज नागपूर येथे महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडणार आहे. दुसरीकडे, राज्यातील परभणी येथे वातावरण चांगलेच तापले आहे. परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर बंद पुकारण्यात आला होता. नंतर या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले.आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी अशा ताणलेल्या घटना येथे लगातार घडल्या. (Parbhani Violence)

या घटने प्रकरणी पोलिसांकडून 50 जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका व्यक्तीचा कारागृहातच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एका 35 वर्षीय व्यक्तीचा कारागृहातच मृत्यू झाला आहे. यामुळे शहरात पुन्हा अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी या व्यक्तीस मृत घोषित केले.यामुळे शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. (Parbhani Violence)

नेमकं प्रकरण काय?

परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड करण्यात आली होती. यानंतर शहरात आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलनावेळी अनेक ठिकाणी तोडफोड झाली. वाहनांचे टायर जाळले गेले. जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेकी केली गेली.

याप्रकरणी, घटनेसाठी जबाबदार असलेल्या 50 लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या परभणी शहरात जमाबंदी आहे. मात्र, कोणतीही संचारबंदी नाही. अशात अटकेत असलेल्या एका व्यक्तीचा कारागृहातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. (Parbhani Violence)

News Title :  Parbhani Violence One person died in jail

महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! छगन भुजबळांना मंत्रीमंडळात डच्चू?, तर धनंजय मुंडेंना ऐनवेळी फोन

रोहित पवार, जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार? तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

मस्साजोग प्रकरण भोवले, धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळात मिळणार डच्चू?

महायुतीची मोठी खेळी! पुण्यातील ‘या’ महिला आमदाराला मिळणार मंत्रिपद?

फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात ‘या’ लाडक्या बहीणींना मंत्रिपदाची लॉटरी?

Join WhatsApp Group

Join Now