परळीत बहीण भाऊ जोमात! “धनुभाऊंनी कमळाच्या चिन्हावर…”

On: November 11, 2024 12:09 PM
Parali Vidhansabha
---Advertisement---

Parali Vidhansabha l विधानसभेच्या रणधुमाळीत परळी विधानसभा मतदारसंघ प्रचंड चर्चेत आहे. कारण परळीमध्ये पंकजा मुद्दे आणि धनंजय मुंडे हे बहीण भाऊ एकत्रित राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा प्रचार करत आहेत. अशातच धनंजय मुंडेंच्या प्रचारार्थ परळीमध्ये पंकजा मुंडे यांनी सभा घेतली. या सभेदरम्यान पंकजा मुंडे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकीत मुंडे बंधू- भगिनी एकत्र :

विधानसभा निवडणुकीत मुंडे बंधू- भगिनी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच परळीतून धनंजय मुंडे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांच्या प्रचारासाठी भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी सभा घेतली आहे. यावेळी धनंजय मुंडे मंचावर असतानाच पंकजा मुंडे यांनी मनातील खंत बोलून दाखवली आहे.

याशिवाय धनंजय मुंडे यांनी कमळाच्या चिन्हावर लढायला पाहिजे होतं असं देखील त्या म्हणाल्या आहेत. तसेच आता आपल्याला धनंजय मुंडे यांना आमदार करायचं आहे. तसेच आत्तापर्यंत आम्ही एकमेकांच्या विरोधात खूप ऊर्जा वाया घातली आहे. तसेच जर आम्ही एक असलो असतो तर कोणालाही खेटलो असतो. याशिवाय या देशात अनेक परिवार एकमेकांविरोधात लढत आहेत. तसेच राजकारणाची पातळी देखील अनेक जणांनी सोडली आहे.

Parali Vidhansabha l सन्मानाची लढाई असते पैशाची व सत्तेची नसते :

मात्र आता या विधानसभा निवडणुकीत आपण एक आहोत. त्यामुळे आता आपल्याला सर्वांना दाखवून द्यायचं आहे. सन्मानाची लढाई असते ही पैशाची व सत्तेची नसते. तसेच कोणतीही छोटी निवडणूक सोपी समजणं हे आपल्या रक्तात नाही. कारण आपण प्रत्येक निवडणूक ही जीव लावून लढवत असतो असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

तसेच तुम्ही कमळ शोधणार आहात? त्यामुळे आता वाटते की धनुभाऊंनी कमळ घेतलं असत तर बरं झालं असतं. कारण मला काहीही वाटत नाही की हा मतदारसंघ संपूर्णतः धनंजय मुंडेंकडे आहे, कारण मी तुमचे आमदार झालेली आहे असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

News Title : Pankaja Munde Sabha For Dhananjay Munde Vidhansabha Election

महत्वाच्या बातम्या –

खासदार महाडिकांवर गुन्हा दाखल; लाडक्या बहिणींना नेमकं काय म्हणाले?

PM मोदी उद्या पुण्यात; मंगळवारी ‘हे’ रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

“फडणवीस तुमचे नाही तर आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले”; ओवैसींचा हल्लाबोल

कॉँग्रेसचा बंडखोरांना दणका, आबा बागुलांसह ‘या’ नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

चंद्रकांत पाटलांच्या विजयाबाबत मेधाताई कुलकर्णी यांना विश्वास; म्हणाल्या, “सर्वाधिक मताधिक्य..”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now