खासदार महाडिकांवर गुन्हा दाखल; लाडक्या बहिणींना नेमकं काय म्हणाले?

On: November 11, 2024 11:13 AM
Dhananjay Mahadik
---Advertisement---

Dhananjay Mahadik l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेतेमंडळी सभा घेत आहेत. अशातच आता राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरातील सभेदरम्यान लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून महाडिक यांच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे.

राज्यात नवा वाद निर्माण :

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर येथे महायुतीची एक सभा पार पडली. या सभेदरम्यान एका विधानाने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. कारण आता राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणले की, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन काँग्रेसच्या सभेला जाणाऱ्यांचे फोटो काढून घ्या असं महाडिक म्हणाले आहेत.

मात्र आता महाडिक यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. कारण आता विरोधकांकडून खासदार धनंजय महाडिक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याशिवाय खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल झाला आहे.

Dhananjay Mahadik l महाडिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल

लाडक्या बहिणींवरून वादग्रस्त वक्तव्य केलेल्या खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता महाडिक यांच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे. तसेच धनंजय महाडिक यांनी भाषणामध्ये धमकी वजा इशारा दिल्याचे असे म्हणत महिला आयोगाने दिलेल्या फिर्यादीवरून महाडिक यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.

याशिवाय धनंजय महाडिक यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी देखील खुलासा करण्याची नोटीस दिली होती. मात्र त्या नोटीशीमध्ये असमाधानकारक उत्तर आल्याने हा गुन्हा दाखल झाला असल्याचं बोलले जात आहे.

News Title : Filed a case against BJP MP Dhananjay Mahadik

महत्वाच्या बातम्या –

“फडणवीस तुमचे नाही तर आमचे पूर्वज इंग्रजांशी लढले”; ओवैसींचा हल्लाबोल

कॉँग्रेसचा बंडखोरांना दणका, आबा बागुलांसह ‘या’ नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

चंद्रकांत पाटलांच्या विजयाबाबत मेधाताई कुलकर्णी यांना विश्वास; म्हणाल्या, “सर्वाधिक मताधिक्य..”

महादेवाच्या कृपेने आज ‘या’ राशींची इच्छापूर्ती होणार!

“त्याने मला शारीरिक दुखापत केली…”, अखेर ऐश्वर्या राय स्पष्टच बोलली

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now