मुंडेंच्या पीएला अटक, जाणून घ्या मध्यरात्रीच्या सुमारास नेमकं काय घडलं

On: November 24, 2025 9:34 AM
Gauri Garje Case
---Advertisement---

Pankaja Munde PA Arrest | पंकजा मुंडे यांचा पीए असलेल्या अनंत गर्जेच्या पत्नी गाैरी पालवे- गर्जे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या नसून हत्या झाल्याचा गंभीर आरोप गाैरीच्या कुटुंबीयांनी केला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर आता वरळी पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत अनंत गर्जेला अटक केली आहे. या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

अनंत गर्जेवर गुन्हा दाखल, मध्यरात्री अटक :

या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अनंत गर्जेला रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी (Varali police) ताब्यात घेतले. गाैरी गर्जेने आत्महत्या केल्याची माहिती अनंत गर्जेनेच स्वतः तिच्या आई-वडिलांना दिल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर ही माहिती पंकजा मुंडे यांच्या आणखी एका पीएला फोनवर दिल्याचंही समोर आलं आहे. पंकजा मुंडेंनी कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रात पोलिसांनी योग्य तपास करावा अशी प्रतिक्रिया दिली होती. (Pankaja Munde PA Arrest)

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अनंत गर्जेचे किरण इंगळे नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते आणि यामुळे पती-पत्नीमध्ये वाद वाढले. गाैरीला हे नाते समजल्यावर सततचा मानसिक आणि शारीरिक त्रास तिला सहन करावा लागत होता. काही दिवसांपूर्वी गाैरीला अनंत गर्जेच्या नावासह गर्भपाताचा रिपोर्ट मिळाल्यानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली, असे कुटुंबीयांनी सांगितले आहे.

Pankaja Munde PA Arrest | घरगुती वादातून घडली शोकांतिका? :

काही दिवसांपूर्वी गाैरीचे आई-वडील अचानक बीडहून मुंबईला पोहोचले असता तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर मारहाणीचे वळ दिसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आत्महत्येच्या मागील कारणांवर संशय निर्माण झाला. पोलिस प्रकरणाची दिशा बदलू शकणारे पुरावे शोधत असून या प्रकरणातील इतर दोन आरोपींबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. (Pankaja Munde PA Arrest)

वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला आज सकाळी 11 वाजता कोर्टात हजर करण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींवर पुढील कोणती कारवाई होते याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

News Title : Pankaja Munde PA Arrested: Police Detain Anant Garje at Midnight in Gauri Death Case

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now