Pankaja Munde | आज 13 मे रोजी राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील 11 मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे, शिरूर, मावळ, बीड , जालना, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदार संघात मतदान सुरु आहे.
बीडमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी मतदान केले. यावेळी त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. माझं राजकीय जीवन हे लोकांच्या आनंदासाठी आणि कल्याणासाठी असल्याचं त्या म्हणाल्या.
“मुंडे यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी लोकसभेचा निकाल”
मतदान केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधत असताना पंकजा मुंडे यांनी एक विचित्र योगायोग निदर्शनास आणून दिला. 4 जूनरोजी या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पण, याच दिवशी मी गोपीनाथ मुंडे साहेबांना अग्नी दिला.अनेक लोकांनी मला या विचित्र योगायोगाविषयी विचारले. मी त्यांच्याशी बोलून त्यांचे मन हलके केले. असं पंकजा ताई म्हणाल्या.
“4 जून रोजीच मी मुंडे साहेबांना अग्नी दिला. याच दिवशी लोकसभेचा निकाल येणार आहे. हा योगायोग नक्कीच आश्चर्यकारक आहे. एखादी व्यक्ती सत्कारासाठी येत असते, पण ती जिवंत येत नाही आणि आता त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी लोकसभेचा निकाल लागत आहे. हा योगायोग नक्कीच आश्चर्यकारक आहे.”, असं भावूक होत पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या.
बीडमध्ये पंकजा मुंडे यांना बजावला मतदानाचा हक्क
2014 मध्ये जेव्हा भाजपा विजयी झाली तेव्हा दिल्लीतील एका अपघातामध्ये गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. 3 जून 2014 रोजी बीड येथील विजयी रॅलीसाठी ते दिल्ली विमानतळाकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या कारचा अपघात झाला होता. यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. त्यानंतर बीडमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
2019 मध्ये पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा राजकीय वनवास सुरू झाला. यावर्षी भाजपने त्यांना तिकीट दिलं आहे. बीडमध्ये त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे उभे राहिले आहेत.
News Title – Pankaja Munde on loksabha election result
महत्त्वाच्या बातम्या-
आहारात प्रोटीन पावडरचा समावेश करताय? तर होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
मतदान करायला घराबाहेर पडण्याअगोदर ही बातमी वाचाच! अन्यथा थांबावा लागेल तासनतास रोडवर उभा
मनोरंजनसृष्टीत शोककळा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघातात जागीच मृत्यू
राजकारणात तापणार! निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरेंनी शरद पवारांवर केली अत्यंत कडू शब्दात टीका






