Tejaswini Pandit | अभिनेत्री तेजस्विनी पंडितची मोठी घोषणा; पोस्ट करत म्हणाली…

On: January 12, 2024 7:46 PM
Tejaswini Pandit
---Advertisement---

Tejaswini Pandit | मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) लवकरच एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. आज तिने चित्रपटाचे पोस्टर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तेजस्विनीने मराठी चित्रपटसृष्टी गाजवलीच मात्र, वेबसीरिजमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता लवकरच ती एका नव्या भूमिकेत दिसून येणार आहे.

तेजस्विनीने पोस्ट करत आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ (Swarajya Kanika Jijau) असे तेजस्विनीच्या अगामी चित्रपटाचे नाव असून याचे पोस्टरही तीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यामुळे तेजस्विनीच्या चाहत्यांना आता तीच्या या आगामी चित्रपटाची प्रतिक्षा असणार आहे.

Tejaswini Pandit | तेजस्विनी पंडितची पोस्ट

तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर आपल्या भूमिकेची पहिली झलकही दाखवली आहे. राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जीवनावर आधारित ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ या चित्रपटात तेजस्विनी मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अनुज देशपांडे आहेत.

म्हणे जन्मावा शिवबा, आधी जिजाऊ घडाव्या लागतात. “दिल्लीपती” कोण असावा हे रायगडावर बसून “हिंदुपती”ठरवणारा ज्यांनी छत्रपती घडवला. स्वराज्याचा वसा घेऊन प्रत्येक मराठी मनावर ठसा उमटवणार्‍या राजमाता जिजाऊसाहेबांना त्रिवार मुजरा व साष्टांग दंडवत. जय भवानी.. जय जिजाऊ.. जय शिवराय.. लवकरच चित्रपटगृहात, अशी पोस्ट तेजस्विनीने केली आहे.

तेजस्विनीच्या (Tejaswini Pandit) या पोस्टनंतर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘तुला या रूपात पाहून डोळे भरून आले’, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने केली. तर, एकाने ‘जिजाऊंचा नवीन चेहरा..खूप शुभेच्छा’, अशी कमेंट केली. तेजस्विनीचा हा नवीन लुक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

नव्या भुमिकेत दिसणार तेजस्विनी पंडित |

समांतर, येरे येरे पावसा, देवा, एक तारा, लज्जा, एकदा येऊन तर बघ अशा चित्रपटांत झळकलेली तेजस्विनी (Tejaswini Pandit) पहिल्यांदाच एका नव्या रूपात दिसणार आहे. तिने अभिनेता प्रभासच्या ‘आदिपुरुष’ मध्येही भूमिका केली आहे. आता लवकरच या ऐतिहासिक चित्रपटात ती दिसणार आहे. ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ हा चित्रपट कधी रिलीज होणार याबाबत अद्याप तेजस्विनीने कोणतीही माहिती जाहीर केली नाही.

News Title- Tejaswini Pandit big announcement

महत्त्वाच्या बातम्या- 

Don 3 | ‘सीरियल किसर ‘पुन्हा दाखवणार जादू; इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार

Munawar Faruqui | ‘एकाच वेळी दोन मुलींना…’, मुनव्वर फारूकीवर गंभीर आरोप

Astro Tips | श्रीमंत व्हायचंय?, ‘या’ सवयी पाळा, कधीच भासणार नाही पैशांची कमी

First Flying Car Booking l Traffic Jam ला टाटा बायबाय!; आता आली जगातील पहिली उडणारी कार, ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरु

Voter ID Card l मतदानकार्ड वरील फोटो आणि पत्ता बदलायचा आहे? अशाप्रकारे घरबसल्या करा अपडेट

Join WhatsApp Group

Join Now