विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! उद्या ‘या’ जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी राहणार

On: July 1, 2026 7:32 PM
School Holiday
---Advertisement---

School Holiday | कोकण आणि मुंबई परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पालघर (Palghar) जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून 2 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनीही अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रेड अलर्टनंतर प्रशासनाचा तातडीचा निर्णय :

सध्या कोकण, मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा मारा सुरू असून अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पनवेल (Panvel), डोंबिवली (Dombivli) आणि नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

याच परिस्थितीचा विचार करून पालघर जिल्हा प्रशासनाने 2 जुलै रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) गुरुवारीही रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने (District Disaster Management Department) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला असून नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

School Holiday | मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाचा जोर कायम :

पालघरप्रमाणेच मुंबई आणि उपनगरांसाठीही पुढील काही तास रेड अलर्ट लागू करण्यात आला आहे. शहरातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या सरीही पडत आहेत. उपनगरांतील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मुंब्रा (Mumbra) परिसरातील काही रस्ते पूर्णपणे जलमय झाल्याने अनेक वाहने पाण्यात अडकलेली दिसून आली.

हवामानातील बदलती परिस्थिती लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने पुढील पाच ते सहा दिवस मुंबई, कोकण किनारपट्टी आणि उपनगरांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

News Title: Palghar Schools Closed After Red Alert

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now