भारताच्या ‘त्या’ एका निर्णयाने पाकिस्तानची उडाली झोप, प्रचंड तणाव वाढला

On: December 31, 2025 2:41 PM
India Pakistan Tension
---Advertisement---

India Pakistan Tension | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या अनेक वर्षांपासून तणावपूर्ण राहिले आहेत. सीमारेषेवर सातत्याने कुरापती करणे, दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी पाठवणे आणि मोठे हल्ले घडवण्याचे कट रचणे, असा पाकिस्तानचा इतिहास राहिला आहे. अशाच पार्श्वभूमीवर भारताने घेतलेल्या एका महत्त्वाच्या संरक्षणात्मक निर्णयामुळे पाकिस्तान पूर्णपणे अस्वस्थ झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने आपली लष्करी ताकद स्पष्टपणे दाखवून दिली होती. या काळात देशाला प्रथमच प्रत्यक्ष ड्रोन हल्ल्याच्या धोक्याचा सामना करावा लागला. त्यानंतर भारताने हवाई सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू केली असून याच निर्णयामुळे पाकिस्तानची झोप उडाल्याचे मानले जात आहे. (Sudarshan Chakra)

मिशन सुदर्शन चक्रमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ

भारताने हवाई धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी ‘मिशन सुदर्शन चक्र’ हा राष्ट्रीय हवाई संरक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रविरोधी प्रणाली आणि ड्रोनविरोधी यंत्रणा अधिक सक्षम केल्या जात आहेत. भारतीय लष्कराकडून सुमारे 8,000 ते 10,000 ड्रोन विकसित करण्याचे काम सुरू असून भविष्यात युद्धतंत्रात ड्रोनची भूमिका अधिक निर्णायक ठरणार आहे.

भारताच्या या व्यापक तयारीमुळे पाकिस्तानमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. इस्लामाबादने थेट चीनकडून ड्रोनविरोधी प्रणाली खरेदी करून ती जम्मू-काश्मीर सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या खर्चासाठी पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांच्या सुविधांवर कपात केली जात असल्याची चर्चा आहे, ज्यामुळे तेथील अस्वस्थता आणखी वाढली आहे.

India Pakistan Tension | भारतीय सैन्याचा मोठा निर्णय, ड्रोन युद्धासाठी सज्जता :

भारत केवळ संरक्षणात्मक उपकरणांवरच भर देत नाही, तर मनुष्यबळालाही भविष्यासाठी तयार करत आहे. भारतीय सैन्याचे उद्दिष्ट आहे की 2027 पर्यंत प्रत्येक सैनिकाला ड्रोन चालवण्याचे मूलभूत प्रशिक्षण दिले जावे. देहरादून येथील इंडियन मिलिटरी अकादमी, चेन्नई व गया येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी तसेच देवळालीतील आर्टिलरी स्कूलमध्ये यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. (Drone Defence System)

सैनिकांना नॅनो, मायक्रो आणि मध्यम आकाराचे ड्रोन वापरण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहलगाम हल्ल्यादरम्यान पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले होते, मात्र भारताने तत्काळ प्रतिउत्तर देत हवेतच पाकिस्तानी ड्रोन निष्क्रिय केले होते. आता भारताकडून ड्रोनचा वापर अधिक व्यापक आणि आक्रमक पद्धतीने केला जाणार असल्याने सीमेवरील तणाव वाढला असून कोणत्याही क्षणी मोठी घडामोड घडू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

News Title: Pakistan Shaken by India’s Major Defence Decision, Border Tension Escalates

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now