पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर कसा हल्ला केला?, पहा थरारक व्हिडीओ!

On: April 24, 2025 4:31 PM
pahalgam attack
---Advertisement---

Pahalgam Attack | काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन घाटीमध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी (Terrorist) हल्ल्याच्या अनेक भीषण पैलूंना आता उजाळा मिळत आहे. या हल्ल्यातून बचावलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीमुळे दहशतवाद्यांच्या क्रूरतेचे खरे स्वरूप समोर आले आहे. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून अंगावर शहारे येतात.

दहशतवाद्यांचा निवडक हल्ला आणि प्रत्यक्षदर्शींचा अनुभव

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बैसरन (Pahalgam Attack) घाटीत भारतभरातून आलेले पर्यटक आनंद घेत असताना, ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेच्या सदस्यांनी अचानक हल्ला चढवला. त्यांनी पुरुष पर्यटकांना वेगळं करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या भ्याड हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा नागरिकांचाही समावेश आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, दहशतवादी आले आणि त्यांनी लोकांना धर्म विचारून वेगळं केलं. त्यानंतर केवळ पुरुषांवर गोळीबार केला गेला.

या घटनेदरम्यान (Pahalgam Attack) काही पर्यटक पळून जाऊन आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. त्यांपैकी एकाने मोबाइलवर संपूर्ण घटना शूट केली असून त्यात दहशतवादी जमिनीवर बसलेल्या पर्यटकांवर बेधडक गोळ्या झाडताना स्पष्ट दिसत आहेत. या व्हिडीओमुळे हल्ल्याचे भयावह दृश्य देशभरात पोहोचले आहे.

व्हिडीओमधून उलगडला हल्ल्याचा क्रूर चेहरा

सामाजिक माध्यमांवर पसरलेल्या या व्हिडीओमध्ये काही पर्यटक जमिनीवर बसलेले आहेत आणि दहशतवादी त्यांच्यावर गोळ्यांचा मारा करत आहेत. या व्हिडीओने देशभरात संतापाची लाट उसळवली आहे. व्हिडीओच्या माध्यमातून हल्ल्याच्या भीषणतेची कल्पना नागरिकांना आली आहे.

पर्यटनासाठी आलेले लोक कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक हेतूने आलेले नसतानाही केवळ त्यांच्या धर्मामुळे निवडून त्यांची हत्या केली गेली, हे या व्हिडीओमधून स्पष्ट होतं. संपूर्ण भारतातून बैसरनच्या घटनेविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

News Title – Pahalgam Attack video goes viral on social media

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now