पहलगाम हल्ला ‘प्लॅन B’चा भाग होता, तर मुख्य ‘प्लॅन A’ असा होता, नव्या दाव्याने खळबळ!

On: April 25, 2025 8:33 PM
Pahalgam Attack update
---Advertisement---

Pahalgam Attack Update | काश्मीरमधील (Kashmir) अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एक खळबळजनक माहिती उघड झाली आहे. मॉडेल एकता तिवारीने दावा केला आहे की, ती ज्या खेचरस्वारांसोबत प्रवास करत होती, त्याचांपैकी दोनजण हेच दहशतवादी होते, ज्यांची रेखाचित्रे सुरक्षा यंत्रणांनी जारी केली आहेत.

दोन खेचरस्वार होते दहशतवादी-

एकता तिवारी हिने सांगितले की, पहलगामला जाताना ती खेचरावरून गेली होती. तिच्यासोबत असलेल्या दोन खेचरस्वारांनी तिच्याशी अश्लील वर्तन केलं होतं. त्यांची हालचाल संशयास्पद वाटल्यामुळे तिने त्यांचा व्हिडिओदेखील शूट केला होता. पुढे जेव्हा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची रेखाचित्रं प्रसिद्ध झाली, तेव्हा तिला समजलं की ती मृत्यूच्या उंबरठ्यावरून परतली आहे. या घटनेची माहिती तिने तत्काळ 1076 या सीएम हेल्पलाइनवर दिली. या दहशतवाद्यांपैकी एकाने बुटात कीपॅड फोन लपवून ठेवला होता आणि तो वारंवार कोणाशी तरी संपर्क साधत होता.

एकता हिने सांगितले की, (Pahalgam Attack Update) या दहशतवाद्यांनी तिला कुराण वाचत नसल्याबद्दल आणि रुद्राक्षाची माळ घातल्याबद्दल धमकावलं होतं. तिने आपल्या CISF मध्ये तैनात असलेल्या नातेवाईकाला याबाबत आधीच माहिती दिली होती. एकता म्हणाली की, या दोघांमध्ये झालेल्या संभाषणात तिने ऐकलं की, पहलगाम हल्ला हा त्यांच्या ‘प्लॅन बी’चा भाग होता. त्यांचा मुख्य प्लॅन ‘ए’ होता – गाडीचे ब्रेक फेल करून मोठा अपघात घडवणे, पण तो अयशस्वी ठरल्यामुळे त्यांनी दुसरा मार्ग अवलंबला.

वैष्णोदेवीपासून पहलगामपर्यंतचा प्रवास-

१३ एप्रिलला (Pahalgam Attack Update) एकता तिच्या नवऱ्यासह, दोन मुलं, भाऊ आणि काही मित्रांसह वैष्णोदेवीच्या यात्रेसाठी निघाली होती. १६ एप्रिल रोजी त्या समूहाने श्रीनगरमार्गे सोनमर्ग गाठलं आणि २० एप्रिलला ते पहलगामला पोहोचले. तिथे एका खेचर मालकाशी संपर्क साधल्यावर, त्याने स्वतः न जाता इतर खेचरस्वारांना तिला घेऊन जायला सांगितलं.

पहलगामपासून सुमारे ६ किमी अंतरावर गेल्यावर, त्या खेचरस्वारांपैकी एकाने तिला विचारले की ती कुठून आली आहे. राजस्थान असल्याचे सांगितल्यावर त्याने अमरनाथ यात्रा केली आहे का, असा प्रश्न केला. जेव्हा तिने नकार दिला, तेव्हा त्याने अमरनाथ यात्रेसाठी त्याच्याशी संपर्क साधण्यास सांगितले.

यानंतर त्याने तिच्या भाऊ आयुष्मानशी रुद्राक्षाच्या माळेबाबत वाद घातला. आयुष्मानने त्याचे स्पष्टीकरण दिल्यावर त्या खेचरस्वाराने त्याला एकांत रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न केला आणि कॉलर पकडून धमकावले. याच दरम्यान एकताने सांगितले की त्या दहशतवाद्याने तिच्या छातीवरदेखील हात टाकण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण प्रसंग अत्यंत धक्कादायक असून, ती आपल्या कुटुंबासह केवळ थोडक्यात वाचल्याचे तिने सांगितले आहे.

News Title – pahalgam attack update plan A and plan B

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now