पहलगाममध्ये थरार! नवऱ्याला मारून दहशतवाद्याने पत्नीला धमकावलं, ‘मोदींना हे सांग…’; महिलेचा हृदयद्रावक अनुभव

On: April 23, 2025 8:58 AM
Pahalgam Attack Thrilling experience of a Karnataka woman
---Advertisement---

Pahalgam Attack | काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा बळी गेला आहे. असल्याची माहिती समोर आली आहे. या भ्याड हल्ल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या कर्नाटकच्या पल्लवी मंजूनाथ यांनी मोठा खुलासा केलाय.  त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू डोळ्यासमोर त्यांनी पाहिला. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ‘आम्हालाही मारा’ असं म्हणत त्यांनी दहशतवाद्यांना विनंती केली, पण दहशतवाद्यांनी त्यांना एक भयानक संदेश देत सोडून दिलं.(Pahalgam Attack )

महिलेचा थरारक अनुभव-

कर्नाटकच्या (Karnataka) शिवमोगा जिल्ह्यातील मंजूनाथ हे आपल्या पत्नी पल्लवी आणि मुलासह पहलगाममध्ये फिरण्यासाठी आले होते. बैसरन खोऱ्याच्या टेकड्यांवर पर्यटक म्हणून गेले असताना त्यांच्यावर लष्करी गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. मंजूनाथ यांना गोळ्या घालण्यात आल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

पल्लवी यांनी सांगितलं की, “दहशतवादी हिंदू असल्याची खात्री करूनच गोळी घालत होते. माझ्या नवऱ्याला मारल्यानंतर मी आणि माझ्या मुलाने त्या दहशतवाद्याला विनवणी केली की आम्हालाही ठार करा. त्यावर त्या दहशतवाद्याने उत्तर दिलं – मी तुला मारणार नाही, मोदींना हे सांग.”

मोदींची संतप्त प्रतिक्रिया 

पल्लवीने पुढे सांगितले की, हल्ल्यानंतर काही स्थानिकांनी त्यांना धीर दिला.  “त्या तिघांनी जीव धोक्यात घालून आमचं संरक्षण केलं,” असं त्यांनी सांगितलं. या घटनेच्या आदल्याच दिवशी मंजूनाथ आणि पल्लवी यांनी शिकारा राईड करतानाचा एक व्हिडीओ शूट केला होता. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या काश्मीर ट्रिपचा आनंददायी अनुभव सांगितला होता. “ही ट्रीप कमाल आहे,” असे पल्लवी म्हणताना दिसतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दहशतवाद्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. “या घृणास्पद हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. यात सहभागी असलेल्यांना माफ केलं जाणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अटळ आहे. तो अधिक मजबूत होईल,” असे मोदींनी एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे.

Title : Pahalgam Attack Thrilling experience of a Karnataka woman

 

 

Join WhatsApp Group

Join Now