Pahalgam Attack | जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे घडलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करून ठार मारण्यात आले. या घटनेतून वाचलेल्यांनी दिलेल्या माहितीवरून, हल्ल्याच्या वेळी काही स्थानिक लोक कुराणाच्या आयती उच्चारत होते, तर दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांना ओळखून त्यांच्यावर गोळीबार केला.
हल्ल्याच्या वेळी धार्मिक ओळख –
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम (Pahalgam Attack) येथील बैसरन या प्रसिद्ध पर्यटनस्थळी इस्लामी दहशतवाद्यांनी थेट पर्यटकांवर धर्म विचारून हल्ला केला. वाचलेल्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी “मुसलमान असाल तर अजान करा” अशी मागणी काही पुरुषांकडे केली. कुराणातील आयती वाचण्यास सांगितले गेले आणि जे ते करू शकले नाहीत, त्यांच्यावर गोळ्यांचा मारा करण्यात आला.
महाराष्ट्रातील पुण्याच्या आसावारी नावाच्या २६ वर्षीय तरुणीने सांगितले की, ती आपल्या कुटुंबासह बैसरनमध्ये पर्यटनासाठी आली होती. अचानक गोळीबार सुरू झाला आणि ते सर्वजण एका तंबूत लपले. तिथे अजून काही पर्यटक आले आणि सर्वजण जमिनीवर आडवे झाले. तिने सांगितले की, त्यांना वाटले ही चकमक दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये सुरू आहे.
परंतु नंतर दहशतवादी तंबूत (Pahalgam Attack) आले आणि तिच्या वडिलांना “चौधरी बाहेर ये” असे म्हणत हाक मारली. त्यांनी वडिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाठिंबा दिल्याबद्दल अपशब्द वापरले. नंतर त्यांच्याकडून कुराणातील आयती म्हणायला लावल्या. जेव्हा ते म्हणू शकले नाहीत, तेव्हा त्यांच्या डोक्याच्या मागे, पाठीवर आणि कानाजवळ गोळ्या झाडण्यात आल्या. नंतर तिच्या काकालाही ४-५ गोळ्या झाडण्यात आल्या.
पीडितांचे अनुभव आणि देशव्यापी संताप
हल्ल्याच्या वेळी तिथे उपस्थित स्थानिक लोक “बिस्मिल्लाह-बिस्मिल्लाह” असे म्हणताना ऐकले गेले. आसावारीने स्पष्ट केले की, दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांवर हल्ला केला. हे संपूर्ण प्रकरण तिने मुंबईवरील २६/११ हल्ल्याशी तुलना केली. तिने असेही सांगितले की दहशतवाद्यांनी पोलीस वर्दीतून हल्ला केला आणि ते सैन्यदलासारखे दिसत होते.
या घटनेतील आणखी एक पीडित पल्लवी या कर्नाटकच्या महिलेने सांगितले की, तिचा नवरा मंजूनाथ हल्ल्यात ठार मारण्यात आला. पल्लवीच्या डोळ्यांसमोर ही घटना घडली आणि ती काहीच समजू शकली नाही. परतीच्या प्रवासातही स्थानिक लोक “बिस्मिल्लाह” उच्चार करत असल्याचे तिने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऊदी अरेबिया दौरा मधेच सोडून दिला आणि २३ एप्रिल रोजी भारतात परतले. देशभरातून या हल्ल्याच्या निषेधात आवाज उठवला जात असून, केंद्र सरकारकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे. हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. एक डझनाहून अधिक जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.






