रेशन कार्डवर नाव चुकलंय? अशाप्रकारे घरबसल्या करा दुरुस्त

On: June 18, 2026 1:05 PM
Ration Card Correction
---Advertisement---

Ration Card Correction | शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. मात्र, अनेक नागरिकांच्या रेशन कार्डमध्ये नावाचे स्पेलिंग चुकीचे असणे किंवा पत्त्यात त्रुटी असणे अशा समस्या आढळतात. यामुळे स्वस्त धान्य वितरणासह विविध सरकारी कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. आता या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता नसून घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

काही मिनिटांत करा नावातील दुरुस्ती :

रेशन कार्डमधील चुकीच्या माहितीमुळे अनेक कुटुंबांना मोफत किंवा अनुदानित धान्याच्या लाभापासून वंचित राहावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टल (National Food Security Portal – NFSA) आणि राज्यांच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या संकेतस्थळांवर नाव दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डिजिटल सेवांच्या माध्यमातून नागरिक आता मोबाईल किंवा संगणकाचा वापर करून सहजपणे अर्ज करू शकतात.

ऑनलाईन अर्जासाठी संबंधित सदस्याचे अचूक नाव असलेले आधार कार्ड (Aadhaar Card) आवश्यक आहे. याशिवाय मतदार ओळखपत्र (Voter ID Card), पॅन कार्ड (PAN Card), शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र किंवा आवश्यकतेनुसार नोटरीकृत प्रतिज्ञापत्रही सादर करता येते. विवाहानंतर महिलांचे नाव बदलण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक ठरते.

Ration Card Correction | अशी आहे अर्ज करण्याची प्रक्रिया :

नाव दुरुस्त करण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टल (NFSA) च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा महाराष्ट्रातील नागरिकांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या महाफूड (Mahafood) पोर्टलवर जावे. त्यानंतर ‘Ration Card’ विभागात जाऊन ‘Apply for Online Modification/Correction’ किंवा ‘Citizen Services’ हा पर्याय निवडावा.

पुढील टप्प्यात रेशन कार्ड क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरच्या मदतीने लॉगिन करावे. मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी टाकून पडताळणी पूर्ण झाल्यानंतर रेशन कार्डमधील सदस्यांची माहिती दिसेल. संबंधित सदस्याच्या नावासमोरील ‘Edit’ किंवा ‘Correction’ पर्यायावर क्लिक करून योग्य नाव मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये भरावे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे पीडीएफ किंवा जेपीईजी स्वरूपात अपलोड करून अर्ज सादर करावा.

अर्ज यशस्वीरीत्या सबमिट केल्यानंतर रिफरन्स नंबर किंवा अॅकनॉलेजमेंट नंबर तयार होतो. हा क्रमांक सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. याच क्रमांकाच्या मदतीने ‘Track Application Status’ या सुविधेद्वारे अर्जाची सद्यस्थिती आणि मंजुरी प्रक्रिया ऑनलाईन पाहता येते.

News Title: Online Ration Card Name Correction

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now