शिंदे गटाचं टेन्शन वाढलं! ओमराजे निंबाळकरांना थेट मंत्रिपद मिळणार?

On: June 21, 2026 6:14 PM
Omraje Nimbalkar
---Advertisement---

Omraje Nimbalkar | धाराशिव (Dharashiv) येथील खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या पुढील राजकीय निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटातील सहा खासदारांच्या संभाव्य बंडाच्या चर्चांदरम्यान ओमराजे यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करूनच पुढील भूमिका जाहीर करणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

गोवर्धनवाडीत बैठका, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चांमध्ये ओमराजे निंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, त्यांनी पक्षांतराबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले आहे. आधी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन त्यानंतरच पुढील पाऊल उचलले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर यांची शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाली आहे. तसेच सोमवारी ते मुंबईतील मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे शिंदे गटाच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

Omraje Nimbalkar | मंत्रिपदाच्या चर्चांना उधाण

शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाकडे एकूण नऊ खासदार असून, त्यापैकी सहा खासदारांनी बंड केल्यास दोन-तृतीयांश संख्याबळ पूर्ण होते. मात्र, ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका बदलल्यास उर्वरित खासदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्या मूळ गावी गोवर्धनवाडी (Govardhanwadi) येथे राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून, तालुकानिहाय बैठका सुरू आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी ते जो निर्णय घेतील, त्याला पाठिंबा देण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. काही कार्यकर्त्यांनी त्यांना मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. बंडखोर खासदारांपैकी एका खासदाराला मंत्रिपदाचे आश्वासन दिल्याच्या चर्चांमुळे ओमराजे यांच्या नावाची अधिक चर्चा होत आहे.

News Title: Omraje Nimbalkar Move Worries Shinde Camp

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now