Omraje Nimbalkar | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ठाकरे गटाच्या शिलेदाराने कडाडून टीका केलीये. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी बंड करून आपली वेगळी चूल मांडली. हे सर्व सत्ताधाऱ्यांच्या भीतीने केलं असल्याचा दावा वारंवार महाविकास आघाडीकडून होताना दिसत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“अजितदादांना खायचं कसं हे माहितीये म्हणून देवेंद्रजींनी त्यांना अर्थखातं दिलं”, असा दावा त्यांनी केला. तर जेलमध्ये जाण्यापेक्षा मुख्यमंत्री झालेलं बरं हाच विचार एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दबावाला बळी पडून घेतला असल्याचा आरोप ओमराजे (Omraje Nimbalkar) यांनी केलाय.
अजित पवार यांच्यावर हल्लाबोल
पंतप्रधानांच्या 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सोबत आलेल्या अजित दादांना भाजपनं अर्थ खात दिलं, कारण खायचं कसं हे त्यांना चांगलं माहित असल्याचा टोलाही त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) लगावला. धाराशिव येथे एका सभेमध्ये ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
“तुरूंगात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री झालेलं बरं”
अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुखासुखी भाजपसोबत गेले नाहीत. त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर करून त्यांना भाजपने आपल्या बाजून वळवलं आहे, असा दावा ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी केला. तुरूंगात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालेलं बरं असं म्हणत ओमराजेंनी अजित पवार यांना देखील धारेवर धरलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केल्याच्या सहा दिवसातच अजित पवार भाजपसोबतच गेले. भाजपने त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं. तसेच अर्थ खातंही दिलं. कारण खायचं कसं. हे त्यांना चांगलं माहिती होतं, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी लगावला आहे.
अनेकांच्या मागे ईडी आणि सीबीआयचा वापर करून भाजपने पक्ष फोडल्याचा विरोधकांचा दावा आहे. यावरून ओमराजे म्हणाले की, जनतेला भाजपची ही वॉशिंग मशीन पटलेली नाही, जनता हिशोब करेल.
News Title – Omraje Nimbalkar Aggressive On Cm Eknath Shinde And Ajit pawar
महत्त्वाच्या बातम्या
राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यावर अत्यंत गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ
महायुतीला पाठिंबा जाहीर करताच अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावरील जप्ती मागे
सलमानने ऐश्वर्या नाही तर ‘या’ मुलीला घातलेली लग्नाची मागणी!
चित्रा वाघ नव्या संकटात, ‘त्या’ अभिनेत्याने समोर येऊन केली मोठी मागणी
स्वप्नांचा चक्काचूर; T20 World Cup मध्ये ‘या’ खेळाडूला डच्चू, वडिलांनी व्यक्त केली नाराजी






