Ola Electric | पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अनेकजण पेट्रोलच्या गाड्यांऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर्स (Electric Scooters) घेण्याकडे वळत आहेत. भारतीय बाजारपेठेत आता ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) ग्राहकांसाठी नवीन जेन 3 (Gen 3) इलेक्ट्रिक स्कूटर्सचे मॉडेल्स लाँच केले आहेत.
जनरेशन 3 प्लॅटफॉर्मवर (Generation 3 Platform) तयार करण्यात आलेल्या नवीन स्कूटरच्या या मॉडेल्समध्ये ओला एस 1 प्रो (Ola S1 Pro), ओला एस 1 प्रो प्लस (Ola S1 Pro Plus), ओला एस 1 एक्स (Ola S1 X) आणि ओला एस 1 एक्स प्लस (Ola S1 X Plus) यांचा समावेश आहे. या सर्व नवीन ओला स्कूटर्स कंपनीच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिम मूव्हओएस 5 (MoveOS 5) वर चालतात. पूर्वी स्कूटरमध्ये हब मोटर्सचा (Hub Motors) वापर केला जात होता, परंतु आता कंपनीने नवीन ओला स्कूटरमध्ये मिड-ड्राइव्ह मोटर्स (Mid-drive Motors) आणि इंटिग्रेटेड मोटर कंट्रोल युनिट्स (Integrated Motor Control Units) चा वापर केला आहे.
वैशिष्ट्ये आणि ड्रायव्हिंग रेंज (Features and Driving Range)
जनरेशन 3 प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आलेल्या या नवीन मॉडेल्ससाठी ओलाने ब्रेक-बाय-वायर टेक्नॉलॉजीचे (Break-by-wire Technology) पेटंट घेतले आहे. तसेच या स्कूटरची नवीन सिस्टीम ब्रेक लिव्हरवर सेन्सरचा (Sensor) वापर करून ब्रेक पॅड वेअर (Brake Pad Wear) आणि मोटर रेझिस्टन्स (Motor Resistance) संतुलित करण्याचे काम करते, परिणामी या स्कूटरच्या रेंजमध्ये 15 टक्क्यांपर्यंत वाढ होते.
सर्व जनरेशन 3 च्या या नवीन स्कूटर्समध्ये सुरक्षेसाठी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (Anti-lock Braking System) देण्यात आली असून यासोबतच या लेटेस्ट मॉडेल्सची किंमत मागील मॉडेल्सच्या तुलनेत 31 टक्क्यांनी कमी झाली आहे. याशिवाय पीक पॉवरमध्ये (Peak Power) ५३ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा दावा आहे की, प्रो प्लस व्हेरियंटचा टॉप स्पीड 141 किमी प्रति तास आहे आणि या स्कूटर्स फुल चार्जवर 320 किलोमीटरपर्यंत रेंज देतील.
ओला एस १ एक्स जेन ३ मॉडेल्सची किंमत
Ola S1X 2kWh या व्हेरिएंटची किंमत 79,999 रुपये इतकी आहे. तर 3kWh व्हेरिएंटची किंमत 89,999 रुपये आणि 4kWhच्या टॉप मॉडेलची किंमत 99,999 रुपये इतकी आहे. Ola S1X Plus च्या 4kWh व्हेरियंटची किंमत 1,07,999 रुपये आहे. या सर्व किंमती कंपनीच्या एक्स-शोरूमच्या (Ex-showroom) किंमती आहेत.
ओला एस१ प्रो जेन ३ मॉडेल्सची किंमत
ओलाच्या या स्कूटरच्या 3kWh व्हेरियंटची किंमत 1,14,999 रुपये आहे. तर 4kWh व्हेरिएंटची किंमत 1,34,999 रुपये इतकी आहे. Ola S1 Pro Plus व्हेरिएंटच्या 4kWhची किंमत 1,54,999 रुपये आणि 5.5kWh व्हेरिएंटची किंमत 1,69,999 रुपये आहे. या सर्व किंमती एक्स-शोरूम किंमती आहेत.
ओलाने आपल्या नवीन जनरेशन 3 इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. किंमत, रेंज आणि फीचर्सच्या बाबतीत या स्कूटर्स नक्कीच आकर्षक आहेत. आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य ती स्कूटर निवडू शकता.
Title : Ola Electric Launches New Gen 3 Electric Scooters in India






