आता बॅलन्स नसतानाही होणार UPI पेमेंट! जाणून घ्या कसे

On: October 9, 2025 7:23 PM
UPI Credit Line
---Advertisement---

UPI Circle | आता BHIM UPI ने आणलेलं नवं फीचर म्हणजे UPI Circle, हे डिजिटल पेमेंट (Digital Payment) जगतात क्रांतिकारी ठरणार आहे. या फीचरमुळे तुमच्या बँक खात्यात कोणतीही रक्कम शिल्लक नसली तरी तुम्ही UPI पेमेंट करू शकता, आणि त्यासाठी ना कोणाला कॉल करण्याची गरज, तसेच कोणतेही थर्ड पार्टी अ‍ॅप वापरण्याची आवश्यकता नाही.

BHIM UPI चे नवे फीचर लाँन्च :

BHIM UPI ने UPI Circle नावाचं हे नवं फीचर लॉन्च केलं आहे, ज्याच्या मदतीने यूझर्स (Users) आपल्याच ओळखीच्या म्हणजेच कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा जवळच्या व्यक्तींना त्यांच्या अकाउंटमधून थेट व्यवहार करण्याची परवानगी देऊ शकतात. हे फीचर विशेषतः वृद्ध व्यक्ती, विद्यार्थी, किंवा ज्यांच्याकडे स्वतःचं बँक खाते नाही अशा लोकांसाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे.

हे फीचर वापरण्यासाठी, यूझरला सर्वप्रथम BHIM अ‍ॅपमध्ये UPI Circle पर्यायावर जाऊन, आपले विश्वासू लोक सर्कलमध्ये Add Family or Friends या ऑप्शनद्वारे जोडावे लागतात. त्यानंतर त्या व्यक्तीचा फोन नंबर किंवा UPI आयडी वापरून त्यांना अधिकृत करता येतं.

UPI Circle | कसे वापरायचे हे फीचर :

सर्कल तयार केल्यानंतर BHIM अ‍ॅप दोन महत्त्वाचे पर्याय देते —

1. Spend with Limit – यात तुम्ही खर्चाची एक मर्यादा सेट करू शकता. सर्कलमधील व्यक्ती त्या मर्यादेपर्यंतच पैसे वापरू शकते.
2. Approval Required – या पर्यायात प्रत्येक व्यवहारासाठी तुमची मंजुरी आवश्यक असते. त्यामुळे नियंत्रण पूर्णपणे तुमच्या हातात राहतं.

या फीचरमुळे डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित, सोपे आणि कुटुंबकेंद्री बनतील. म्हणजेच आता घरातील ज्येष्ठ सदस्यांना, मुलांना किंवा बँक अकाउंट नसलेल्या व्यक्तींनाही तुमच्या खात्यातून सहज UPI पेमेंट करता येईल, तेही तुमच्या नियंत्रणाखाली.

BHIM UPI Circle हे फीचर भारतातील डिजिटल पेमेंट सिस्टमला एक नवीन दिशा देणार आहे.

News Title :- Now you can make UPI payments even with zero balance! New UPI feature lets others transact from your account 

Join WhatsApp Group

Join Now