आता घरबसल्या पाहा तुमच्या ग्रामपंचायतीच्या खर्चाचा हिशोब! जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

On: October 7, 2025 12:26 PM
Gram Panchayat App
---Advertisement---

Gram Panchayat App | ग्रामपंचायतीतून होणाऱ्या प्रत्येक खर्चाचा आणि विकासकामांचा तपशील आता ग्रामस्थांना थेट त्यांच्या मोबाइलवर पाहता येणार आहे. शासनाने सुरू केलेल्या ‘ई-ग्रामस्वराज’ पोर्टल (eGramSwaraj, Gram Panchayat app) आणि मोबाइल अ‍ॅपमुळे ग्रामपंचायतीचा आर्थिक कारभार किती पारदर्शक आहे हे जाणून घेणे अधिक सोपे झाले आहे.

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ही व्यवस्था लागू करण्यात आली असून, आता गावातील प्रत्येक नागरिकाला आपल्या ग्रामपंचायतीचा आर्थिक अहवाल, विकास आराखडा आणि निर्णयांचा संपूर्ण तपशील मिळणार आहे. (Gram Panchayat app)

ग्रामपंचायतीचा खर्च आता पारदर्शकपणे तुमच्या मोबाईलवर :

पूर्वी ग्रामपंचायतींना केंद्र आणि राज्य वित्त आयोगाकडून मोठा निधी मिळत असला तरी तो नेमका कोणत्या कामांसाठी वापरला जातो, हे ग्रामस्थांना समजणे कठीण होत असे. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेत जाऊन विचारावे लागे. मात्र आता ‘ई-ग्रामस्वराज’ पोर्टलमुळे ही सर्व माहिती थेट गावकऱ्यांच्या हातात आली आहे.

या अ‍ॅपवर गावातील विकासकामांची नावे, मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च, तसेच कामांची सद्यस्थिती यांचा तपशील दिला जातो. त्यामुळे ग्रामस्थांना सुरू असलेल्या प्रकल्पांवर लक्ष ठेवता येते आणि निधीचा योग्य वापर झाला आहे का हे पडताळता येते. (eGramSwaraj, Gram Panchayat app)

Gram Panchayat App | अ‍ॅप कसे वापरावे? मिळणारी माहिती कोणती? :

‘eGramSwaraj’ अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. डाउनलोड करून ‘ग्रामपंचायत’ पर्याय निवडा आणि त्यानंतर आपले राज्य, जिल्हा, तालुका व गावाचे नाव भरल्यानंतर संपूर्ण आर्थिक हिशोब, ग्रामसभा निर्णय आणि विकास आराखडा पाहता येतो. या अ‍ॅपसाठी कोणत्याही लॉग-इन किंवा पासवर्डची आवश्यकता नाही, कारण ही सर्व माहिती सार्वजनिक आहे.

या पोर्टलवर केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे तर ग्रामपंचायतीचा वार्षिक विकास आराखडा, ग्रामसभा निर्णय, लोकसंख्या, क्षेत्रफळ, निवडून आलेले सदस्य यांसारखी सर्व महत्त्वाची माहितीही पाहायला मिळते. त्यामुळे हे अ‍ॅप ग्रामपंचायतीसाठी एक डिजिटल रेकॉर्ड म्हणून कार्य करते. (Gram Panchayat app)

ग्रामपंचायतीचा निधी कुठून येतो? :

केंद्रीय आणि राज्य वित्त आयोगाचा निधी, जिल्हा नियोजन मंडळ, विविध शासकीय योजना, तसेच घरपट्टी, पाणीपट्टी आणि स्थानिक करांमधून मिळणारे उत्पन्न हे ग्रामपंचायतीचे प्रमुख आर्थिक स्रोत आहेत. या सर्व व्यवहारांची पारदर्शक नोंद आता ‘ई-ग्रामस्वराज’वर पाहता येते.

News Title: Now Track Your Gram Panchayat Budget and Development Works on eGramSwaraj App – Full Transparency for Villagers

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now