बंडू आंदेकर आज पुन्हा भरणार उमेदवारी अर्ज; ‘त्या’ हत्येच्या आरोपानंतर निवडणुकीत नवा ट्विस्ट

On: December 29, 2025 2:11 PM
Bandu Andekar
---Advertisement---

Bandu Andekar | पुणे महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुन्हा एकदा महापालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून, आज 29 डिसेंबर रोजी तो आपला उमेदवारी अर्ज पुन्हा दाखल करणार आहे. सध्या बंडू आंदेकर येरवडा केंद्रीय कारागृहात असूनही त्याची निवडणूक प्रक्रियेत सक्रिय उपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे.

27 डिसेंबर रोजी आंदेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोलीस व्हॅनमधून भवानी पेठ येथील सरकारी केंद्रात आणण्यात आला होता. यावेळी त्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला होता आणि दोन्ही हात रशीने बांधलेले होते. सरकारी केंद्रात नेत असताना आंदेकरने ‘आंदेकरला मत म्हणजे विकासाला मत’ अशी घोषणाबाजी केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. (Pune Mahanagarpalika Election 2026)

अर्ज अपूर्ण, आज पुन्हा नामांकन प्रक्रिया :

निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बंडू आंदेकरने सादर केलेला उमेदवारी अर्ज अपूर्ण होता. आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे तो अर्ज तात्काळ स्वीकारण्यात आला नाही. त्यामुळे त्याची उमेदवारी प्रक्रिया पूर्ण मानली जाऊ शकत नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आंदेकरचे वकील मिथुन चव्हाण यांनी सांगितले की, उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे, मात्र काही औपचारिक कागदपत्रे शिल्लक राहिली आहेत. या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आंदेकर आज 29 डिसेंबर रोजी पुन्हा नामांकन प्रक्रिया पूर्ण करणार आहे. आंदेकर भवानी पेठ वॉर्ड कार्यालयातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष मकोका न्यायालयाने त्याला सशर्त परवानगी दिल्यानंतरच ही प्रक्रिया पार पडत आहे. (Pune Crime Politics)

Bandu Andekar | आयुष हत्या प्रकरणामुळे वातावरण तापले :

दरम्यान, या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. बंडू आंदेकरची वहिनी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनीही न्यायालयाच्या परवानगीनंतर आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या दोघीही आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी आहेत. पाच सप्टेंबर रोजी नाना पेठ परिसरात गोळी झाडून आयुष कोमकर यांची हत्या करण्यात आली होती. ( Pune Municipal Election 2026)

या घटनेनंतर आयुष कोमकरच्या आईने तीव्र भावना व्यक्त करत, बंडू आंदेकरला कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी दिल्यास आत्मदहन करण्याचा गंभीर इशारा दिला आहे. “आंदेकरने माझ्या मुलाला विकासासाठी मारलं का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला असून, यामुळे पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिकच तापले आहे. तसेच मुंबईसह पुणे आणि राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक गडद होताना दिसत आहे.

News Title: Notorious Gangster Bandu Andekar to Refile Nomination Today for Pune Civic Elections Amid Huge Controversy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now