Pune Loksabha l सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरु आहेत. तीन टप्प्यातील निवडणुका देखील पार पडल्या आहेत. अशातच आता संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या निवडणुकीकडे लागलं आहे. 13 मे ला पुणे लोकसभा मतदार संघातील निवडणूक पार पडणार आहे. या मतदार संघातील निवडणुकीसाठी अनेक वरिष्ठ नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र आता पुण्यातील उमेदवाराचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
पुण्यात उमेदवारांच्या निवडणूक खर्चात मोठी तफावत :
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि शिरूरमधील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवडणूक खर्चात दुसऱ्या फेरीत मोठी तफावत आढळली आहे. त्यामुळे या चारही उमेदवारांना निवडणुका आयोगाने नोटिसा पाठवून त्याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे.
मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने खर्च 13 लाख सहा हजार 474 रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खर्चाची पडताळणी केली त्यावेळी तफावत जाणवली आहे. त्यामध्ये तब्बल प्रत्यक्षात 49 लाख 34 हजार 58 रुपये खर्च झाल्याची नोंद आढळली आहे. त्यामुळे खर्चात 36 लाख 27 हजार 584 रुपयांचा मोठा फरक जाणवत आहे. याशिवाय मोहोळांचे विरोधक काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या खर्चात तब्बल 11 लाख 67 हजार 709 रुपयांची तफावत आढळली आहे. याशिवाय निवडणूक खर्चाचे स्वतंत्र खाते न उघडल्याबाबत पुणे मतदारसंघातील अन्य 4 उमेदवारांना देखील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
Pune Loksabha l एकूण सहा उमेदवारांना पाठवल्या नोटिसा :
शिवाजीराव आढळराव यांच्या खर्चाच्या तपासणीत शॅडो अहवालानुसार, तब्बल 53 लाख 38 हजार 334 रुपयांचा खर्च झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय त्यांनी प्रत्यक्षात 22 लाख 91 हजार 548 रुपयांचा खर्च दाखवला आहे. त्यामुळे 30 लाख 46 हजार 786 रुपयांचा खर्चाची मोठी तफावत आढळली आहे.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी 43 लाख 96 हजार 426 रुपयांचा खर्च झालेला असताना त्यापैकी केवळ 32 लाख 18 हजार 968 इतका खर्च निवडणुका आयोगाला दाखविला आहे. त्यामुळे त्यांच्या खर्चात तब्बल 11 लाख 77 हजार 458 रुपयांची मोठी तफावत आढळली आहे. शिरूरमधील वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अन्वर शेख, बहुजन समाज पार्टीचे राहुल ओव्हाळ, भारतीय जवान किसान पार्टीचे नारायण अंकुशे यांच्यासह एकूण सहा जणांना देखील निवडणुका आयोगाने नोटिसा पाठवल्या आहेत.
कोणत्या उमेदवाराच्या खर्चामध्ये किती तफावत?
– भाजपचे मुरलीधर मोहोळ – 36,27,584
– काँग्रेसचे रवींद्र धंगेकर – 11,67,709
– महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे – 11,77,458
– महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील – 30,46,786
News Title – Notices to Mohols, Dhangekars, Kolhes, Adharans; Clarification sought due to discrepancy in election expenses
महत्त्वाच्या बातम्या-
या राशीच्या व्यक्तींना मित्रमंडळींच्या मदतीने उत्पन्नाच्या संधी मिळतील
“तेच आदित्य ठाकरे ज्यांच्या ज्यूस आणि नाश्त्याची सोय श्रीकांत शिंदे करायचे”
टी 20 विश्वचषकआधी पाकिस्तानातून धमकी; ‘त्या’ फोनने एकच खळबळ
कंगना म्हणते ‘बिग बी नंतर मलाच जास्त मान’, प्रसिद्ध अभिनेत्याला हसू आवरेना
महाराष्ट्रात ‘या’ तारखेला मान्सून दाखल होणार, पंजाब डख यांचा अंदाज






