क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल होणार?, जय शहा निर्णय घेण्याच्या तयारीत

On: May 12, 2024 2:10 PM
No toss in CK Nayudu U 23 said Jay Shah
---Advertisement---

Jay Shah | देशात सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. त्यानंतर लगेच टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यापूर्वीच देशांतर्गत क्रिकेटमध्ये बदल करण्यासाठी बीसीसीआय सचिव जय शाह यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.यामध्ये टॉस हद्दपार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

क्रिकेटमध्ये टॉसवर बरंच काही अवलंबून असतं. टॉस आपल्या बाजूने यावा, असं प्रत्येक कर्णधाराला वाटत असतं.सामन्याआधी होणाऱ्या टॉसमुळे सामन्याचं गणित ठरतं. दोन्ही संघाचे कर्णधार खेळपट्टीनुसार टॉसनंतर काय निर्णय घ्यायचा ते ठरवतात. त्यामुळे टॉसचं महत्व क्रिकेटमध्ये अनन्यसाधारण आहे.

क्रिकेट सामन्यापूर्वी टॉस करणे बंद होणार?

अशात बीसीसीआयने आता या टॉसबाबत आयपीएलच्या 17 व्या मोसमादरम्यान मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. या संदर्भात अधिकृत अशी माहिती समोर आली नसली तरी, सध्या सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा होतेय. बीसीसीआयने एका स्पर्धेतून टॉस हा प्रकारच हद्दपार केल्याची जोरदार चर्चा आहे.

काही मीडिया रिपोर्टनुसार जय शाह (Jay Shah ) यांनी सीके नायडू अंडर 23 स्पर्धेतून टॉस प्रकार हद्दपार करण्याचा उल्लेख केल्याचं म्हटलंय.या स्पर्धेतून टॉस हद्दपार केला जाईल आणि पाहुण्या संघाला बॅटिंग/फिल्डिंग जे हवं ते करण्याची सूट दिली जाईल, असं म्हटलं जातंय. त्यामुळे पाहुणा संघाला अगोदर फलंदाजी हवी की गोलंदाजी याबाबत निर्णय घेईल.

जय शाह यांचा मोठा निर्णय

यासोबतच अजून एक निर्णय खेळाडूंसाठी घेण्यात आला आहे. मागे (BCCI) टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याने सामन्यामध्ये खेळाडूंसाठी विश्रांतीसाठी पर्याप्त वेळ असायला हवा. अशी मागणी केली होती. त्यानुसार आगामी हंगामात खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ दिला जाणार असल्याचं जय शाह (Jay Shah )यांनी म्हटलंय.

News Title :  No toss in CK Nayudu U 23 said Jay Shah 

महत्वाच्या बातम्या- 

बीडच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांच्या सहकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

“भाजपने तिला भुंकण्यासाठी पाठवलं”, इम्तियाज जलील यांचा नवनीत राणांवर पलटवार

‘अमित शहा यांना पंतप्रधान बनवलं जाईल’; ‘या’ बड्या नेत्याची भविष्यवाणी

…तेव्हा फक्त तयारी ठेवा!, सगळ्यांना दम भरणाऱ्या अजित पवारांना अमोल कोल्हेंनी भरला दम

उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेचं घातलं बारसं?, म्हणाले…

Join WhatsApp Group

Join Now