वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी ‘या’ नेत्याचा खळबळजनक खुलासा, पोस्ट शेअर करत दिली मोठी माहिती!

On: May 19, 2025 6:15 PM
Vaishnavi Hagawane Post-Mortem Report
---Advertisement---

Vaishnavi Hagawane | राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar Group) नेते राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांच्या सुनेची आत्महत्येची घटना आता गंभीर वळणावर आली आहे. १६ मे रोजी मुळशीतील भुकूम (Bhukum) येथे वैष्णवी शशांक हगवणे (Vaishnavi Shashank Hagawane) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. बावधन पोलीस ठाण्यात (Bavdhan Police Station) राजेंद्र हगवणे यांच्यासह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली.

काय म्हटलं पोस्टमध्ये?

अवघ्या २३ व्या वर्षी एका नवविवाहित तरुणीने हुंड्याच्या छळाला कंटाळून आपले जीवन संपवले. ही हृदयद्रावक घटना राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar Group) चे नेते राजेंद्र हगवणे (Vaishnavi Hagawane) यांच्या घरात घडल्याने समाजमन हादरले आहे. मृत युवती वैष्णवी हगवणे ही त्यांच्या सुनेची ओळख असलेल्या तरुणीची आत्महत्या, आता संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

नवरा, सासू, नणंद अटकेत-

या प्रकरणात पती शशांक हगवणे, (Vaishnavi Hagawane) सासू लता हगवणे, आणि नणंद करिश्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे सध्या फरार असून, लवकरच त्यांनाही पकडले जाईल, असा विश्वास पोलिसांनी दिला आहे.

सामाजिक न्यायाचा मुद्दा अधोरेखित करत, काही महिला नेत्यांनी थेट भूमिका घेतली असून, “कोणताही पक्ष, कोणताही नेता असो, गुन्हेगाराला माफ नाही,” असा ठाम संदेश त्यांनी दिला आहे. ही देवाभाऊंची (Devendra Fadnavis) सत्ता आहे, आणि इथे गुन्हेगाराला कोणतीही सूट मिळणार नाही, असाही इशारा दिला गेला आहे.

वैष्णवीला मिळणार न्याय, आरोपी होणार शिक्षेस पात्र

राजकीय संबंध किंवा दबाव बाजूला ठेवून वैष्णवीला पूर्ण न्याय मिळवून देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पोलिस तपास प्रगतीपथावर असून, सर्व आरोपींना शिक्षा होईपर्यंत संघर्ष सुरू राहील, असा निर्धार अनेकांनी व्यक्त केला आहे. समाजात महिलांवरील अन्याय थांबवण्यासाठी ही केस एक उदाहरण ठरावी, अशीही अपेक्षा व्यक्त होते आहे.

News Title – No Mercy for Vaishnavi Hagawane Killers

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now