Nitin Nabin | भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पदभार स्वीकारताच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, असम, पुदुचेरी आणि केरळ (Kerala) या राज्यांत निवडणुका होत असून, या सर्व ठिकाणी भाजपसाठी लढत कठीण मानली जात आहे. विशेषतः केरळ विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी सर्वात आव्हानात्मक ठरणार असल्याने, नितीन नबीन यांनी या राज्याची जबाबदारी थेट महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांच्यावर सोपवली आहे.
विनोद तावडे (Vinod Tawade) हे संघटनात्मक बांधणीमध्ये कुशल मानले जातात. याआधी बिहार विधानसभा (Bihar Vidhansabha) निवडणुकीतील यशस्वी रणनीतीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली होती. तसेच चंदीगड महापौर निवडणुकीसाठीही त्यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता केरळमध्ये भाजपचा विस्तार करत सत्ता स्थानापर्यंत नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली असून, त्यांच्या सोबत शोभा करंदलाजे यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे.
अन्य राज्यांसाठी नियुक्त्या जाहीर :
नितीन नबीन (Nitin Nabin) यांनी इतर राज्यांतील निवडणुकांसाठीही संघटनात्मक बदल केले आहेत. तेलंगणातील नगर परिषद निवडणुकांसाठी आशिष शेलार यांना प्रभारी म्हणून नेमण्यात आले असून, अशोक परनामी आणि रेशा शर्मा यांना सहप्रभारी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच ग्रेट बंगळुरु महापालिका निवडणुकीसाठी वरिष्ठ नेते राम माधव यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, सतीश पुनिया आणि संजय उपाध्याय यांना सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या नियुक्त्यांमुळे भाजपने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीला गती दिल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पक्षाची पाळंमुळे भक्कम करण्यावर नेतृत्वाचा भर असल्याचे स्पष्ट होत आहे.
Nitin Nabin | केरळमध्ये सत्ता मिळवण्याचं आव्हान :
केरळमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारांचा प्रभाव मोठा असल्याने भाजपसाठी सत्ता मिळवणे कठीण मानले जाते. राज्यातील राजकारण प्रामुख्याने यूडीएफ आणि एलडीएफ या दोन आघाड्यांभोवती फिरते. तरीही गेल्या काही वर्षांत भाजपचा मतांचा टक्का वाढताना दिसत आहे. 2014 मध्ये भाजपला केरळमध्ये 14 टक्के मत मिळाली होती, ती 2019 मध्ये 16 टक्क्यांपर्यंत पोहोचली आणि 2024 मध्ये सुमारे 20 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
भाजपला केरळमध्ये सत्ता मिळवायची असेल, तर 20 ते 30 टक्के आणि पुढे 30 ते 40 टक्के मतांचा टप्पा गाठावा लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे केरळचा किल्ला जिंकण्याचं सर्वात कठीण मिशन नितीन नबीन यांनी विनोद तावडे यांच्यावर सोपवलं असून, आगामी काळात त्यांच्या रणनीतीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
News Title: Nitin Nabin Assigns Maharashtra Leader Vinod Tawde to Crack BJP’s Toughest Battle in Kerala
Nitin Nabin, BJP National President, Vinod Tawde, Kerala Assembly Elections, Mission South
नितीन नबीन, भाजप अध्यक्ष, विनोद तावडे, केरळ निवडणूक, मिशन साऊथ






