केतन अग्रवाल हत्येचा थरार! पोलिसांच्या हाती लागला मोठा पुरावा, तिसऱ्या व्यक्तीला केली अटक

On: June 25, 2026 12:23 PM
Ketan Agarwal Case
---Advertisement---

Ketan Agarwal Case | पुणे (Pune) जिल्ह्यातील बहुचर्चित केतन विशाल अग्रवाल (Ketan Vishal Agarwal) हत्या प्रकरणात तपासाला नवे वळण मिळाले आहे. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) गुन्हे शाखेने आता नीरज कुमार (Neeraj Kumar) या तिसऱ्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा मित्र चेतन चौधरी (Chetan Choudhary) हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता नीरज कुमारच्या नावाची भर पडल्याने या संपूर्ण कटामागील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोबाईलच्या आधारे उघड झाला धक्कादायक तपशील :

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, चेतन चौधरीने पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचे लोकेशन लपवण्यासाठी पूर्वनियोजित पद्धतीने योजना आखली होती. 18 जून रोजी घडलेल्या घटनेच्या दिवशी त्याने स्वतःचा नियमित वापरातील मोबाईल घरीच ठेवला होता. त्यामुळे त्याचे लोकेशन लोहगड किल्ला (Lohagad Fort) परिसरात आढळू नये, हा त्यामागील उद्देश असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

याचवेळी चेतनने त्याच्याकडे काम करणाऱ्या नीरज कुमारचा मोबाईल स्वतःकडे घेतल्याचे तपासातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, केतन अग्रवाल यांना सुमारे 400 फूट खोल दरीत ढकलून देण्याच्या आधीपासून ते घटनेनंतरही चेतन हा नीरजच्या मोबाईलवरून सिया गोयलच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या मोबाईलचा गुन्ह्यातील वापर हा तपासाचा महत्त्वाचा भाग ठरला आहे.

Ketan Agarwal Case | नीरजची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात :

तांत्रिक पुरावे आणि कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासल्यानंतर वापरण्यात आलेला मोबाईल नीरज कुमारचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने तातडीने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या मोबाईलचा वापर खुनाच्या काळात झाल्याचे पुरावे मिळाल्याने तपास अधिक वेगाने पुढे सरकत आहे.

सध्या पोलीस नीरज कुमारला या कटाची आधीपासून माहिती होती का, त्याने आरोपींना कोणत्याही प्रकारे मदत केली का किंवा त्याच्या नकळत मोबाईलचा वापर करण्यात आला का, याचा शोध घेत आहेत. या नव्या घडामोडीनंतर हा खून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचा संशय अधिक बळावला आहे. नीरजची चौकशी सुरू असून या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग उघड होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.

News Title: Niraj kumar arrest in ketan agrawal death case

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now