निलेश लंकेंचा मोठा डाव; सुजय विखेंची कोंडी?

On: May 2, 2024 8:12 PM
Ahmednagar Lok Sabha Exit Poll
---Advertisement---

Nilesh Lanke | अहमदनगर दक्षिण मतदारसंघात (Ahmednagar Loksabha) महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आलीये. महायुतीकडून भाजपचे नेते सुजय विखे (Sujay Vikhe) यांना उमेदवारी देण्यात आलीये.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा (Ahmednagar Loksabha) मतदारसंघातील वातावरण चांगलंच तापलंय. अशात निलेश लंकेंनी (Nilesh Lanke) मोठा डाव टाकत सुजय विखेंची कोंडी केल्याच्या चर्चा मतदारसंघात सुरू आहेत.

निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अण्णा हजारेंची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याबाबत स्वत: लंकेंनी ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण आदरणीय अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन आशीर्वाद घेतले. अण्णांच्या प्रकृतीविषयी चौकशी करत सामाजिक व राजकिय परस्थितीवर चर्चा करण्यात आल्याचंही लंके यांनी या भेटीनंतर म्हटलं आहे

अण्णांना मानणारा मोठा वर्ग अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे, निलेश लंकेंनी अण्णांची भेट घेऊन विखेंची कोडी करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लंकेंनी घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही उमेदवार एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काही दिवसांआधी सुजय विखे यांनी एका सभेमध्ये तुतारी वाजवण्याचं आवाहन केलं. त्यानंतर नगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांच्या बाजूनं वातावरण फिरलं असल्याच्या चर्चा आहेत. सध्या नगर लोकसभेत निलेश लंके (Nilesh Lanke) यांचा जोरदार प्रचार सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या बृजभूषण सिंहांना मोठा धक्का!

“दादांना साहेबांचा आवाका माहित असता तर…”; रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

परिणीती चोप्राच्या पतीवर पार पडली शस्त्रक्रिया, प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर!

कडक उन्हातून घरी आल्यावर चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका!

‘चित्रा वाघ आधी रेवण्णा सेक्स स्कँडलवर बोला’; आदित्य ठाकरेंनी सुनावलं

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now