Electric car | भारतात इलेक्ट्रिक कारची मागणी सातत्याने वाढत आहे. कार कंपन्या त्यांच्या पेट्रोल आणि डिझेल कारलाच EV मध्ये बदलण्यात व्यस्त आहेत. तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक कारच्या किमती कमी होतील. सरकारनेही अर्थसंकल्पात लिथियम-आयन बॅटरी स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. नुकतीच किया इंडियाने आपली नवीन एसयूव्ही Syros लाँच केली आहे. (Electric car)
डिझाइन आणि किमतीच्या बाबतीत ही गाडी ‘व्हॅल्यू फॉर मनी’ नाही. त्यामुळे विचारपूर्वक खरेदी करा. ऑटो कार इंडिया आणि अन्य काही मीडिया रिपोर्टनुसार, Kia Syros ची इलेक्ट्रिक आवृत्ती पुढील वर्षी भारतात लॉन्च केली जाऊ शकते. Syros EV ची किंमत 15 ते 20 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. भारतात ही कार Tata Nexon EV शी स्पर्धा करेल.
बॅटरी आणि रेंज
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Syros EV मध्ये 42kWh आणि 49kWh चा बॅटरी पॅक मिळू शकतो जो अनुक्रमे 300 किमी आणि 355 किमीची WLTP-रेटेड रेंज देऊ शकतो. जानेवारी-ते-मार्च 2026 मध्ये Syros EV बाजारात येण्याची शक्यता आहे. याच्या डिझाइनमध्येही थोडे बदल केले जाऊ शकतात. सध्या या कारबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही.
डिझाइन आणि फीचर्स
नवीन Syros ची एक्स-शोरूम किंमत 9 लाख रुपयांपासून ते 17 लाख रुपयांपर्यंत आहे. त्याचबरोबर, तिची किंमतही खूप जास्त आहे. Syros पेक्षा मारुती सुझुकी ब्रेझा हा एक चांगला पर्याय आहे जो खरोखरच ‘व्हॅल्यू फॉर मनी’ आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, Kia Syros मध्ये 1-लिटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लिटर डिझेल इंजिनचे पर्याय मिळतात. (Electric car)
किती आहे मायलेज?
मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, 1-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशनसह 18.20 kmpl आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 17.68 kmpl चे मायलेज देईल. तर, 1.5-लिटर डिझेल मॅन्युअल गिअरबॉक्ससह 20.75 kmpl आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह 17.65 kmpl चे मायलेज देईल. हे मायलेज कंपनीने सांगितलेले आहे, परंतु जेव्हा तुम्ही ते दररोज वापराल तेव्हा तुम्हाला त्याचे खरे मायलेज कळेल.
Title : New Electric Car to Launch in India Soon Kia Syros EV to Rival Tata Nexon EV






