Viral Video | आजच्या डिजिटल युगात इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेले अश्लील व्हिडिओ पाहणे अनेकांसाठी सामान्य बाब झाली आहे. मात्र यामागे लपलेले गंभीर परिणाम पाहता ही सवय मानसिक, शारीरिक, वैवाहिक आणि सामाजिक आयुष्यावर खोलवर घाव घालू शकते.
मानसिक व लैंगिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम-
अश्लील व्हिडिओ (Viral Video) पाहिल्यावर मेंदूत डोपामिन हार्मोनचा स्फोट होतो. ही कृत्रिम आनंदाची जाणीव हळूहळू व्यसनात रूपांतरित होते. एक वेळ अशी येते की, अशा व्हिडिओंशिवाय मानसिक समाधान मिळेनासं होतं. यातून नैराश्य, अपराधगंड, एकटेपणा आणि अस्वस्थता निर्माण होते.
लैंगिक आरोग्यावरही याचे गंभीर परिणाम दिसून येतात. अश्लील व्हिडिओंमधील अतिशयोक्त अभिनय आणि कृत्रिम दृश्यांमुळे वास्तविक लैंगिक आयुष्यावर परिणाम होतो. स्तंभन दोष, शीघ्रपतन आणि संभोगातील असमाधानासारख्या समस्या वाढू शकतात. खऱ्या नात्यांमध्ये आनंद गमावला जातो.
नातेसंबंध, वर्तन आणि तरुण पिढीवर परिणाम-
या सवयीमुळे (Viral Video) जोडप्यांमध्ये विश्वासाचा अभाव, गैरसमज, आणि संवादातील अंतर वाढते. पोर्नमधील आभासी अनुभवांवर आधारित अपेक्षा खऱ्या नात्यांमध्ये गैरसमज निर्माण करतात. याशिवाय, चिडचिडेपणा, तणाव आणि समाजापासून अलिप्तता वाढते.
तरुण वयात ही सवय लागल्यास अभ्यासात लक्ष लागत नाही, चुकीच्या लैंगिक कल्पना तयार होतात आणि मुलींबाबत विकृत विचार बळावतात. हे सर्व तरुण मनाच्या विकासासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
गिल्ट, नैतिक गुंतागुंत आणि उपाययोजना-
पोर्न पाहिल्यानंतर अनेकांना अपराधगंड वाटतो. “हे चूक आहे” असं वाटूनही ही सवय सुटत नाही. यातून आत्मविश्वास कमी होतो आणि anxiety निर्माण होते. यावर उपाय म्हणून डिजिटल डिटॉक्स करणे, ध्यान-योगाचा सराव, पार्टनरशी मोकळा संवाद आणि मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणं हे प्रभावी ठरू शकतं.






