मोठी बातमी! नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापिकेला अटक

On: May 22, 2026 8:05 PM
NEET UG
---Advertisement---

NEET Paper Leak Case | नीट यूजी (NEET UG) 2026 पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पुण्यातील प्राध्यापिका मनिषा हवालदार (Manisha Hawaldar) यांना अटक करण्यात आली आहे. याआधीही या प्रकरणात अनेक आरोपींना अटक झाली असून तपासाचा फास आणखी घट्ट होताना दिसत आहे.

सीबीआयच्या तपासात नवे धागेदोरे :

नीट (NEET) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीमुळे देशभरातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआय (CBI) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. तपासादरम्यान मनिषा हवालदार (Manisha Hawaldar) यांनी फिजिक्सचा पेपर लीक केल्याचा आरोप समोर आला आहे. त्यामुळे त्यांना पुण्यातून अटक करण्यात आली.

यापूर्वी लातूर (Latur) येथील प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी (P. V. Kulkarni) यांना अटक करण्यात आली होती. ते केमिस्ट्री विषयाचे प्राध्यापक असून नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) अर्थात एनटीए (NTA) च्या परीक्षा प्रक्रियेशी अनेक वर्षांपासून संबंधित होते. त्यामुळे प्रश्नपत्रिकांपर्यंत त्यांची सहज पोहोच असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

NEET Paper Leak Case | आतापर्यंत 11 जण जेरबंद :

सीबीआयच्या (CBI) तपासात पी. व्ही. कुलकर्णी (P. V. Kulkarni) यांनी प्रश्नपत्रिकेचा गैरवापर करून पेपर लीक केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मनिषा वाघमारे (Manisha Waghmare) यांना अटक करण्यात आली. पुढे एनटीएशी (NTA) संबंधित बायोलॉजी प्राध्यापिका मनिषा मांढरे (Manisha Mandhare) यांनाही दिल्ली (Delhi) येथून ताब्यात घेण्यात आले. त्या मूळच्या पुण्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे.

आता मनिषा हवालदार (Manisha Hawaldar) यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील आरोपींची संख्या 11 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात अटक झालेल्या तिन्ही महिला आरोपींचे नाव ‘मनिषा’ असल्याने त्याचीही मोठी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

News title : NEET Paper Leak Case Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now