नीट पेपरफुटी प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे; मोटेगावकरचा मास्टरप्लॅन अन् बेकायदेशीर संपत्तीचा पर्दाफाश

On: May 20, 2026 12:08 PM
Shivraj Motegaonkar
---Advertisement---

NEET Paper Leak 2026 | नीट परीक्षा (NEET Exam 2026) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाचा वेग वाढवला असून मुख्य आरोपी शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar) याच्याबाबत अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रश्नपत्रिका लीक करण्यासाठी आखलेला कट, बेकायदेशीर मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांचा तपास आता अधिक व्यापक झाला आहे.

प्रश्नपत्रिका फुटीचा सुनियोजित कट उघड

सीबीआय (CBI) तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षा (NEET Exam 2026) पेपरफुटीचा संपूर्ण कट शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar) याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने रचला होता. यासाठी त्याने आपल्या क्लासमध्ये कार्यरत असलेल्या पीव्ही कुलकर्णी (PV Kulkarni) आणि मनीषा मांढरे (Manisha Mandhare) यांना राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) च्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलमध्ये सहभागी करून घेतल्याचा आरोप आहे.

तपासात असेही स्पष्ट झाले आहे की, पीव्ही कुलकर्णी (PV Kulkarni) यांनी रसायनशास्त्र आणि मनीषा मांढरे (Manisha Mandhare) यांनी जीवशास्त्र विषयातील प्रश्न प्रश्नपत्रिका तयार करतानाच लक्षात ठेवले. नंतर हे प्रश्न हाताने लिहून शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar) याच्याकडे पाठवले गेले. त्याने हे प्रश्न पीडीएफ स्वरूपात मोबाईलमध्ये सेव्ह करून पैशांच्या बदल्यात विकल्याचा आरोप आहे. परीक्षा ३ मे रोजी झाल्यानंतर त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी डेटा डिलीट केला, मात्र सीबीआयने (CBI) तो डेटा पुन्हा मिळवत त्याला अटक केली.

बेकायदेशीर मालमत्ता 

पेपरफुटी प्रकरणासोबतच शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar) याच्या मालमत्तेबाबतही मोठे खुलासे झाले आहेत. लातूर (Latur) येथे त्याने सुमारे साडेसहा कोटी रुपयांची आठ भूखंडे बेकायदेशीररित्या विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही जमीन अनिल कुमार अग्रवाल (Anil Kumar Agrawal) यांच्याकडून खरेदी करण्यात आली असून व्यवहाराची आर्थिक नोंद खरेदी कागदपत्रांमध्ये नसल्याचे सांगितले जात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी (Mallikarjun Bhaikatti) यांनी हा प्रकार उघडकीस आणला.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता नाशिक (Nashik) येथील काही खासगी क्लासेस आणि शिक्षण संस्थांपर्यंत पोहोचला आहे. शुभम खैरनार (Shubham Khairnar) याच्या चौकशीतून काही संस्थांची नावे पुढे आली असून सीबीआयने (CBI) संबंधित संस्थांना नोटिसा बजावल्याची माहिती आहे. मोठ्या आर्थिक व्यवहारांची चौकशी, बँक खात्यांची तपासणी आणि दलालांशी असलेल्या आर्थिक संबंधांचा तपास सुरू आहे. तसेच काही क्लासेस आणि संस्थांवर लवकरच छापेमारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News Title: NEET Paper Leak 2026 Shivraj Motegaonkar CBI Investigation

Join WhatsApp Group

Join Now