“६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण सेक्स…”, नीना गुप्तांचं वक्तव्य चर्चेत

On: June 20, 2025 2:41 PM
Neena Gupta
---Advertisement---

Neena Gupta | बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता त्यांच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. अनेकदा त्या परखडपणे त्यांचे मत मांडताना दिसतात. सध्या नीना गुप्ता त्यांच्या ‘मेट्रो इन दिनो’ या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहेत आणि त्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. ‘मेट्रो इन दिनो’ सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी महिलांच्या रोमान्सबद्दल आणि भारतीय महिलांच्या मानसिकतेबद्दल महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.

नीना गुप्तांचं वक्तव्य चर्चेत

नीना गुप्ता यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं की, “६०, ७० किंवा ८० वर्षांच्या माणसाला रोमान्स करण्याची इच्छा होत नाही, असं नाही. आपल्याकडे महिला, खासकरून भारतातील महिला, असा विचार करतात की आता झालं.” चाळीशीनंतरच त्या असा विचार करू लागतात. मात्र, आता मध्यम वर्षांच्या महिला जिममध्ये जातात, कारण त्यांना फिट राहायचे आहे. पण, त्यासाठी इच्छा असणे महत्त्वाचे आहे. इच्छा असल्यामुळेच त्या हे सगळे करतात. जोपर्यंत आपण श्वास घेतो, तोपर्यंत आपण स्वप्न बघत असतो, असं नीना गुप्ता यांनी म्हटलं.

मी अजूनही रोमँटिक होते- नीना गुप्ता

त्या पुढे म्हणाल्या, “मी अजूनही रोमँटिक होते. रोमान्स म्हणजे फक्त सेक्स किंवा आकर्षण नाही, तर रोमान्स म्हणजे चांगली भावना अनुभवणे.” त्यांनी रोमान्सची व्याख्या अधिक व्यापक करत म्हटले, “मी माझ्या कपड्यांसोबत रोमान्स करते. जेव्हा मी छान तयार होते, तेव्हा मला खूप छान वाटतं.” त्यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवाबद्दलही सांगितले, “मी ज्या घरातून येते, तिथे बिकिनी वगैरे घालणं चालत नाही. पण, जेव्हा मी मुंबईत आले आणि एकटी राहायला लागले. मी बाथरूममध्ये बिकिनी घालून स्वतःला आरशात पाहिल्यानंतर मला छान वाटलं,” असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, ‘मेट्रो इन दिनो’ सिनेमा येत्या ४ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमात नीना गुप्ता यांच्यासोबत सारा खान, आदित्य रॉय कपूर, अनुपम खेर, अली फझल हे कलाकार आहेत. अनुराग बासूने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

News Title- Neena Gupta’s Bold Statement

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now