अजितदादांना मोठा झटका, कट्टर समर्थक शरद पवारांच्या गळाला?

On: September 13, 2024 9:58 AM
Ajit Pawar
---Advertisement---

NCP Ajit Pawar | महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच महायुतीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. महायुतीमधील नेत्यांची सर्वाधिक इनकमिंग ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटात सुरू आहे. अशात पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांना पुण्यातील एक बडा नेता धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. (NCP Ajit Pawar)

महायुतीने विधानसभेसाठी राज्यात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, दुसरीकडे शरद पवार यांच्याकडे इच्छुकांच्या भेटीगाठीसाठी गर्दी जमली आहे. कोल्हापूरमध्ये शरद पवारांनी भाजपला धक्का दिला. आता थोरले पवार इतर जागांसाठी चाचपाणी करत आहेत. महायुतीत उमेदवारीवरून सध्या नाराजीनाट्य सुरू आहे. यामुळे अनेक नेते हे महाविकास आघाडीकडे वळत आहेत.

अनिल बाबा राक्षे आणि अमोल कोल्हे भेट

सध्या पुण्यातील खेड तालुक्यामधून एक बातमी समोर येत आहे. अजित पवारांच्या खेड दौऱ्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक अनिल बाबा राक्षे यांच्यात भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. राक्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्याचं म्हटलं जातंय. (NCP Ajit Pawar)

अशात राक्षे यांनी शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांची भेट घेतल्याने ते तुतारी हाती घेणार काय?, याबाबत चर्चा रंगत आहे. महायुतीची त्यामुळे डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आता अजितदादा राक्षे यांची नाराजी दूर करणार काय, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

पुण्यात अजित पवारांचा कट्टर समर्थक सोडणार साथ?

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे यांनी अजित दादांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवत डॉ. अमोल कोल्हे यांच्या खेड तालुक्यातील दौऱ्यात हजेरी लावली होती. इतकंच नाही तर, राक्षे यांच्या निवासस्थानी जाऊन कोल्हे यांनी जेवणाचा आस्वादही घेतला. त्यामुळे राक्षे लवकरच शरद पवार गटात जाणार, अशा चर्चा आता रंगत आहेत. (NCP Ajit Pawar)

अनिल बाबा राक्षे खेड आळंदी विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत, अशात त्यांच्या शरद पवार गटामधील नेत्यांशी भेटीगाठी सुरू असल्याने राजकीय वर्तुळात ते तुतारी फुंकणार, असं म्हटलं जातंय. असं झाल्यास विधानसभेपूर्वीच हा अजित पवार यांना मोठा धक्का मानला जाईल.

News Title : NCP Ajit Pawar group leader may join Sharad Pawar group

महत्वाच्या बातम्या-

सरकारकडून सर्वसामान्यांना मिळणार मोठं गिफ्ट, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त?

मोठी बातमी! अंबरनाथ MIDC कंपनीत गॅस गळती, केमिकल धूराने नागरिक त्रस्त

देवी लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 3 राशींच्या आर्थिक समस्या दूर होतील!

अजित पवारांचा सल्लाही फाट्यावर मारला, लेक थेट बापाविरूद्ध उभी ठाकणार

खडसे निष्ठा सिद्ध करणार का? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनचं आव्हान!

Join WhatsApp Group

Join Now