नागपूर | नवाब मलिक (Nawab Malik) तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कुठल्या गटात जाणार याची एकच चर्चा रंगली होती. दोन्ही गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती, मात्र त्यानंतर नवाब मलिक नेमके कुणासोबत याचे उत्तर समोर आले नव्हते.
दरम्यान, विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशानाला नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे, त्यानिमित्ताने नवाब मलिकांना कुठल्या तरी एका गटाची निवड करावी लागणार होती, त्यामुळे नवाब मलिक कोणत्या बाजूच्या बाकावर बसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
नवाब मलिकांनी कुठल्या गटाची निवड केली?
नवाब मलिक आज सकाळी सभागृह परिसरात दाखल झाले. यावेळी त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांची भेट घेतली. अनिल देशमुख यांची तर त्यांनी गळाभेट घेतली. शरद पवार गटाच्या नेत्यांना भेटल्यानंतर नवाब मलिक थेट अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांच्या कार्यालयात गेले.
नवाब मलिक अनिल पाटील यांच्या कार्यालयात गेल्याने सर्वकाही स्पष्ट झाले होते, मात्र त्यानंतर जेव्हा नवाब मलिक सभागृहात दाखल झाले तेव्हा त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसणे पसंत केले, त्यामुळे नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं.
नवाब मलिकांवर काय आरोप?
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक (Nawab Malik) यांच्यावर आरोप आहेत. या प्रकरणी त्यांना अटक झाली होती, त्यानंतर 1 वर्षे आणि 5 महिन्यांचा तुरुंगावास भोगल्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता.
प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांना जामीन मिळाला होता. सुरुवातीला 2 महिन्यांसाठी जामीन मिळाला होता, त्यानंतर या जामिनाला 3 महिने मुदतवाढ देण्यात आली. मलिक तुरुंगाबाहेर आल्यानंतर ते कुठल्या गटात जाणार याची एकच चर्चा रंगली होती.
News Title: nawab malik join ajit pawar group
महत्त्वाच्या बातम्या-
Aditya Thackeray | दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना झटका, आता…
Pune Crime | ‘माझी नाही तर कोणाचीच नाही…’; पुण्यात घडला धक्कादायक प्रकार
Dhananjay Munde | “बापाची चप्पल पोराच्या पायात आली म्हणजे तो…”
Uddhav Thackeray | ठाकरेंचा मोठा प्लॅन; शिंदे सरकार अडचणीत येणार?
MS Dhoni | “समोरच्या टीमनं 400 बनवले तरी…”, शर्माजीच्या मुलाचं धोनीबद्दल मोठं वक्तव्य






