आनंदाची बातमी! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुहूर्त ठरला

On: September 13, 2025 12:31 PM
Airport News
---Advertisement---

Navi Mumbai Airport Opening | मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर आहे. बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर महिन्याअखेर पहिले विमान झेपावणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात असून, संबंधित यंत्रणांनी याबाबत अधिकृत प्रसिद्धपत्रकही जारी केले आहे. (Navi Mumbai Airport Opening Date)

छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरील ताण कमी होणार :

सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड प्रवासी दडपण आहे. नवी मुंबईतील नवीन विमानतळ सुरू झाल्याने हा ताण कमी होणार असून, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवासाचा वेळ वाचणार असून, थेट आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहेत.

विमानतळाची वैशिष्ट्ये :

– उलवे नोड, पनवेलजवळ 1160 हेक्टर क्षेत्रात उभारलेले हे विमानतळ वार्षिक ९ कोटी प्रवाशांना सेवा देऊ शकेल.

– अत्याधुनिक पायाभूत सुविधा, नवीन तंत्रज्ञान आणि सुरक्षित वातावरण प्रवाशांना मिळणार आहे. (Navi Mumbai Airport Opening Date)

– मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, गोवा हायवे, जेएनपीटी बंदर आणि अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) यामुळे विमानतळाशी कनेक्टिव्हिटी सोपी होणार आहे.

– पनवेल रेल्वे स्टेशनला रिजनल हब म्हणून विकसित केले जात असून, पुणे व कोकणातून शटल सेवा सुरू होणार आहे.

Navi Mumbai Airport Opening | बस सेवा आणि पर्यावरणपूरक उपक्रम :

एमएसआरटीसीकडून ठाणे, वाशी, दादर आणि पनवेल येथून थेट विमानतळापर्यंत एक्सप्रेस बस सेवा सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये इलेक्ट्रिक बसना प्राधान्य दिले जाणार असून, पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

सिडकोकडून विमानतळाशी जोडणारा ९ किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्याचे काम सुरू आहे. याशिवाय खारघर, उलवे आणि पनवेलमध्ये नवीन टाउनशिप, बिझनेस पार्क आणि लॉजिस्टिक हब विकसित होत आहेत. यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

News Title : Navi Mumbai International Airport Opening: First Flight to Take Off by September-End

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now