ऑफरच्या नावाखाली घातला जातोय गंडा, महाराष्ट्रात राहात असाल तर सावध राहा

On: March 2, 2025 11:14 AM
MLA AI Scam
---Advertisement---

Loan Scam | महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) एका मोठ्या आर्थिक फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे, जिथे ‘नावी इन्स्टंट लोन ॲप’ने (Navi Instant Loan App) अनेकांना कर्जाच्या जाळ्यात ओढले आहे. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील ढोकी (Dhoki) हे गाव या घोटाळ्याचे केंद्रस्थान बनले असून, या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे. मोबाईल रिचार्जच्या आकर्षक ऑफर्स दाखवून तरुणांना फसवण्यात आल्याचे उघड झाले आहे. (Loan Scam)

मोबाईल रिचार्जच्या आमिषाने फसवणूक

ढोकी गावातील जवळपास २०० ते ३०० तरुण या ॲपच्या फसव्या योजनांना बळी पडले आहेत. ‘नावी ॲप’ने (Navi App) ख्रिसमसच्या (Christmas) निमित्ताने एक विशेष ऑफर आणली होती, ज्यामध्ये केवळ १ रुपयामध्ये ३९९९ रुपयांचा मोबाईल रिचार्ज करण्याची संधी देण्यात येत होती. या आमिषाला भुलून अनेक तरुणांनी युपीआय (UPI) मार्फत पैसे भरले.

पैसे भरल्यानंतर काही दिवसातच, या तरुणांच्या बँक खात्यांमधून मोठ्या रकमा परस्पर काढण्यात आल्याचे लक्षात आले. ढोकी गावातील फसवणूक झालेल्यांमध्ये किराणा दुकानातील कामगार, पेट्रोल पंपावरील कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि बेरोजगार तरुणांचा समावेश आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा घोटाळा सुमारे दोन ते तीन कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे.

बँक खाती गोठवून वसुलीचा प्रयत्न

‘नावी ॲप’ने रिचार्जच्या बहाण्याने तरुणांना मोठ्या कर्जाच्या सापळ्यात अडकवले आहे. आता हे ॲप सक्तीने पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी, तरुणांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत, ज्यामुळे ते त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकत नाहीत. यामुळे त्रस्त झालेले तरुण बँकांमध्ये तक्रार करत आहेत, परंतु बँक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की या व्यवहारांशी बँकेचा कोणताही संबंध नाही, कारण हे व्यवहार ग्राहकांनी स्वतःहून युपीआयच्या (UPI) माध्यमातून केले आहेत.

अनेकांनी आपल्या मित्र आणि नातेवाईकांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून रिचार्ज केले होते. त्यामुळे, ज्यांचे मोबाईल क्रमांक वापरले गेले, त्यांच्या नावावरही कर्ज काढले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्ज फेडायचे कुठून? असा मोठा प्रश्न या सर्व तरुणांसमोर उभा ठाकला आहे.

या प्रकरणाची व्याप्ती ढोकी गावापुरती मर्यादित नसून धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी असे प्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फसवणुक झालेल्या व्यक्तींकडून लवकरच अधिकृत तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात (Maharashtra) ‘नावी ॲप’च्या (Navi App) कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणांची दखल घेतली असून, लवकरच तपासाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. (Loan Scam)

Title : Navi App Loan Scam Exposed in Maharashtra

 

Join WhatsApp Group

Join Now