Hardik Pandya | भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि मॉडेल-नृत्यांगना नताशा स्टॅन्कोविक सध्या चर्चेत आहेत. त्यांचा गेल्या वर्षी जुलै महिन्यात घटस्फोट झाला. दोघांनाही एक मुलगा आहे, मात्र आता त्यांचे वैयक्तिक आयुष्य नव्या वळणावर पोहोचले आहे. घटस्फोटानंतर हार्दिकच्या ((Hardik Pandya)) नवीन नात्याच्या चर्चा सुरू झाल्या, तर नताशाने देखील तिच्या पुढील वाटचालीबद्दल स्पष्ट मत मांडले आहे.
हार्दिकच्या नव्या नात्याची चर्चा
घटस्फोटाच्या अवघ्या एका महिन्यानंतरच हार्दिकचे नाव ब्रिटिश गायिका आणि टीव्ही स्टार जास्मिन वालियाशी जोडले गेले आहे. दोघेही सुट्टीसाठी एकाच ठिकाणी गेल्याचे चर्चेत आले आहे. मात्र, त्यांनी यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. हार्दिकच्या या कथित प्रेमसंबंधांमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेला उधान आले आहे.
काय म्हणाली नताशा?
एका मुलाखतीत नताशा स्टॅन्कोविकने (Natasa Stankovic) तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उघडपणे सांगितले आहे. ती म्हणाली की, “गेल्या काही महिन्यांमध्ये ती अनेक चढ-उतारांमधून गेली आहे. मात्र, आता ती आयुष्याला नवीन दृष्टीकोनातून पाहत आहे.” तसेच ती पुढे बोलताना म्हणाली की, “मी पुन्हा प्रेमात पडायला तयार आहे. आयुष्याने जसे नवे अनुभव दिले, तसेच मी त्याला स्वीकारण्यास तयार आहे.”
वाढदिवसाचा खास अनुभव
नताशाने मार्चमध्येच तिचा वाढदिवस साजरा केला. नताशाने एक अनुभव शेअर करत सांगितले की, त्या दिवशी ती संपूर्ण दिवस तिच्या मुलासोबत होती. संध्याकाळी मित्रांसोबत गप्पा मारल्या आणि हा दिवस तिच्यासाठी खास राहिला. तिने हे देखील सांगितले केले की, 2024 हे वर्ष तिच्यासाठी खूप कठीण होते, पण त्या अनुभवाने तिला अधिक धैर्यशील बनवले. नताशाने स्पष्ट केले की, ती नातेसंबंधांना महत्त्व देते आणि तिच्या मते, प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते.
हार्दिक-नताशाच्या जीवनात नवे वळण?
सोशल मीडियावर हार्दिक आणि जास्मिन यांच्या नात्याबद्दल चर्चेत असताना, नताशाचे नाव देखील सर्बियन फिटनेस मॉडेल अलेक्झांडर इलिकसोबत जोडले जात आहे. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. हार्दिक आणि नताशा वेगवेगळ्या वाटांवर आहेत. दोघेही नव्या नात्यांसाठी तयार आहेत का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.






