नाशिककरांनो सावधान! ‘या’ दिवशी नळाला पाणी येणार नाही; महापालिकेचा मोठा निर्णय

On: April 1, 2026 9:01 PM
Pimpri Chinchwad Water Cut
---Advertisement---

Nashik Water Cut Alert | नाशिककरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. नाशिक महानगरपालिकेकडून शहरात दोन दिवसांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार (4 एप्रिल) आणि रविवार (5 एप्रिल) या दोन दिवसांत संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

आधीच काही भागांत पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना आता सलग दोन दिवस पाणी बंद राहणार असल्याने नागरिकांनी आवश्यक ते नियोजन करून पाण्याचा साठा करून ठेवण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद ठेवण्यामागचे कारण :

महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाकडून शहरात पाणीपुरवठा व्यवस्थेच्या सुधारणा आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या कामांत 500 मिमी पाईपलाईनची 700 मिमी मुख्य लाईनशी जोडणी करण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय शहरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकास कामांसह कुंभ मेळा आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाशी संबंधित काही महत्त्वाच्या कामांचाही या शटडाऊनमध्ये समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Nashik Water Cut Alert | कोणत्या भागात पाणी येणार नाही? :

या दोन दिवसांच्या कालावधीत नाशिक शहरातील जवळपास सर्वच विभागांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. यात नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, सातपूर, नाशिक रोड आणि नवीन नाशिक या भागांचा समावेश आहे. (Nashik Water Cut Alert)

नाशिक पूर्व विभागातील कलानगर परिसर, गांधीनगर, जेल रोड, देवळाली कॅम्प आणि नाशिक-पुणे रोडलगतचा परिसर या भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर नाशिक पश्चिम विभागात त्र्यंबक रोड, एबीबी सर्कल, कॉलेज रोड, गंगापूर रोड आणि पी अँड टी कॉलनी या परिसरांनाही या शटडाऊनचा फटका बसणार आहे.

6 एप्रिलला कमी दाबाने पाणीपुरवठा :

महानगरपालिकेच्या माहितीनुसार 4 आणि 5 एप्रिल रोजी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहील. त्यानंतर 6 एप्रिल रोजी सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि पाण्याचा वापर नियोजनपूर्वक करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिककरांनी पुढील दोन दिवसांसाठी आवश्यक तयारी करून पाणी जपून वापरणे महत्त्वाचे ठरणार आहे.

News Title: Nashik Water Cut Alert: Water Supply to Remain Shut for Two Days on April 4 and 5

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now