Sudhakar Badgujar | नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घटना आज समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर चर्चेत असलेले नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी आज भारतीय जनता पक्षात (BJP) अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा बूस्ट मिळाला आहे.
शक्तिप्रदर्शनासह भाजपमध्ये दमदार एन्ट्री :
पक्षप्रवेशाआधी सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्या समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. यावेळी बबन घोलप, काँग्रेस आणि इतर पक्षांतील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला.
भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सुरुवातीला बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवला होता, मात्र तो विरोध झुगारून पक्षाने त्यांचा स्वीकार केला.
Sudhakar Badgujar | बडगुजर म्हणाले – दूध का दूध, पाणी का पाणी होईल! :
भाजप प्रवेशानंतर बडगुजर म्हणाले, “कोरोनाच्या काळात मी लोकांसाठी रक्तदान शिबिरं, कोविड सेंटर चालवलं. पण तरीही माझ्यावर पक्षातून कारवाई झाली. ज्या पक्षाने माझा अपमान केला, त्यांना मी सांगू इच्छितो – महापालिका निवडणुकीत दूध का दूध, पाणी का पाणी होईल!”
सुधाकर बडगुजर यांचा राजकीय प्रवास :
– 2007 मध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले
– 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश
– 2009-2012 : सभागृहनेते, नाशिक महापालिका
– 2012-2015 : विरोधी पक्षनेते
– 2014 व 2019 विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिममधून अपयश (Sudhakar Badgujar)
बडगुजर हे संजय राऊत यांचे विश्वासू मानले जात होते. मात्र आता त्यांचा भाजपमध्ये प्रवेश ही राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलणारी बाब ठरू शकते. भाजपने त्यांच्या माध्यमातून नाशिकमधील स्थानिक मतदारसंघात आपली पकड वाढवण्याचे संकेत दिले आहेत.






